‘दामिनी’, ‘घातक’, ‘घायल’, खाकी’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’ ‘अंदाज अपना अपना’सारखे चित्रपट देणारे राजकुमार संतोषी सध्या चर्चेत आहेत, नुकताच त्यांच्या ‘गांधी-गोडसे एक युद्ध या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. राजकुमार संतोषी बॉलिवूडमधील एक प्रख्यात दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. बॉलिवूडमधील स्टार प्रकारावर त्यांनी भाष्य केलं आहे.
८० चं दशक गाजवणारे राजकुमार संतोषी ‘गांधी-गोडसे एक युद्ध हा चित्रपट बऱ्याच वर्षांनंतर घेऊन येत आहेत. अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एकूणच चित्रपट, बॉलिवूड आणि त्यातील स्टार्सवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘स्टार सिस्टीममुळे बॉलिवूडचे नुकसान होत आहे का?’ या प्रश्नावर ते असं म्हणाले की, “तुम्ही एका माणसाला देव बनवून टाकता त्यामुळे उद्योग डबघाईला येत आहे. ‘बाहुबली’पूर्वी प्रभासला कोण ओळखत होते? ‘कांतारा’ इतका गाजला बहुतेक लोकांना त्याच्या नायकाचे नाव देखील माहित नसेल. आज फक्त कन्टेन्ट सलेल्या कलाकृती चालतात. लोक म्हणतील की तो हिरोचा चित्रपट होता. मी म्हणेन की हा त्याचा चित्रपट नसून संपूर्ण टीमचा चित्रपट आहे.”
“माझ्यावर बायोपिक बनला तर ‘या’ अभिनेत्याने साकारावी प्रमुख भूमिका”, महेश कोठारेंनी व्यक्त केली इच्छा
ते पुढे म्हणाले की,” चित्रपट निर्मिती ही माझी उपजीविका आहे. पण ‘भगतसिंग’ आणि ‘गांधी गोडसे एक युद्ध’ बनवून मी या जगाकडून आणि समाजाकडून जे काही घेतलं आहे त्याच्या बदल्यात मी काहीतरी त्यांना देत आहे. भगतसिंगसारखे शूर युवक तरुणांसाठी आदर्श असावेत गुटखा विकणारे स्टार्स नाहीत.” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘बॉयकॉट पठाण’ मोहिमेवर प्रसिद्ध चित्रपटगृहाच्या मालकांनी केलं भाष्य; म्हणाले…
दरम्यान ‘‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाची पटकथा दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांचं असून ए आर रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. या महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच २६ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटप्रेमी आणि राजकुमार संतोषी यांचे चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत..