टायगर श्रॉफची मुख्य भूमिका असलेल्या ‘गणपत’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये टायगर जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. त्याच्याशिवाय क्रिती सेनॉन आणि अमिताभ बच्चन देखील या सिनेमात दिसणार आहेत. चित्रपटात रोमान्स आणि अॅक्शन पाहायला मिळणार आहे. फक्त टायगरच नाही तर क्रितीही यात अॅक्शन करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“…लोक म्हणतात की मी उद्धट आहे,” गश्मीर महाजनीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘गणपत’च्या अॅक्शनपॅक ट्रेलरमध्ये तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये तुम्हाला मशीन गनपासून अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतात. टायगर आपल्या ट्रान्सफॉर्मेशन आणि अॅक्शनने प्रेक्षकांचा चाहता आहे. अशातच क्रिती देखील अॅक्शन अवतारात दिसत आहे. पहिल्यांदाच ती चित्रपटात अॅक्शन व स्टंट करताना दिसत आहे. याबरोबरच ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन यांची धडाकेबाज एन्ट्री लक्ष वेधून घेणारी आहे.

अॅक्शनशिवाय या टायगर आणि क्रितीचा रोमान्सदेखील पाहायला मिळणार आहे. ‘हिरोपंती’नंतर पुन्हा एकदा टायगर व क्रितीची जोडी ऑनस्क्रीन दिसणार आहे. सिनेमात गुड्डूची गणपत होण्यापर्यंतची कहाणी दाखवण्यात येणार आहे. ‘गणपत’चे दिग्दर्शक आणि लेखक विकास बहल आहेत. या चित्रपटाचे निर्माते विकास बहल, विशू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख आहेत. २० ऑक्टोबरला हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.