आतापर्यंत अनेक मराठी कलाकारांनी मराठी बरोबरच हिंदी चित्रपट सृष्टीतही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. त्यानंतर अनेक मराठी कलाकार हिंदी सिनेमांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना आपल्याला दिसतात. तयात अभिनेता गश्मीर महाजनी याचंही नाव सामील झालं आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील हॅंडसम हंक अशी ओळख असलेला अभिनेता गश्मीर महाजनी याने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. नुकताच तो प्रसिद्ध असलेला ‘झलक दिखला जा’ या शोमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. आपल्या नृत्य कौशल्याची छाप सर्वांवर पाडतो या चित्रपटाच्या फिनालेपर्यंत पोहोचला. त्याच्या डान्सचं अनेक दिग्गजांनी कौतुक केलं. या शोमुळे त्याचा चाहता वर्ग आणखीनच वाढला. आता तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झाला आहे.

आणखी वाचा : ‘हेरा फेरी ३’च्या निर्मात्यांना मोठा धक्का; अनीस बज्मी यांनी धुडकावली चित्रपट दिग्दर्शनाची ऑफर, कारण देत म्हणाले…

गश्मीरच्या या पहिल्या बॉलीवूड चित्रपटाचं नाव आहे ‘छोरी २.’ या चित्रपटात तो अभिनेत्री नुसरत भरूचाबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसेल. हा चित्रपट एक स्त्रीप्रधान आणि सस्पेन्स चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०२१ साली प्रदर्शित झाला होता. त्या पहिल्या भागामध्ये कोणत्याही अभिनेत्याची महत्त्वपूर्ण भूमिका नव्हती. आता दुसऱ्या भागात गश्मीर एका दमदार भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा : “तू तुझ्या आयुष्याचा सुलतान…” माधुरी दीक्षितने केले गश्मीर महाजनीचे कौतुक

हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं बोललं जात आहे. गश्मीर आता हिंदी चित्रपटात दिसणार हे कळल्यावर त्याचे चाहते खूप खुश आणि उत्सुक झाले आहेत.

Story img Loader