‘बिग बॉस ७’ची विजेती आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. गौहर खान आणि तिचा पती जैद दरबार यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. गौहर खानने बुधवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौहर खान आणि जैद दरबारने नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिला मुलगा झाल्याची माहिती दिली आहे. “आम्हाला मुलगा झाला आहे. सलाम ऊ अलैकुम, या सुंदर जगात तुझे स्वागत. १० मे २०२३ ला आम्हाला आमच्या आनंदाचा खरा अर्थ काय हे कळले. आम्हाला मुलगा झाला आहे. तुमचे प्रेम आणि प्रार्थनेबद्दल आभार. कृतज्ञ आणि नवीन पालक झैद आणि गौहर”, असे तिने यात म्हटले आहे.
आणखी वाचा : “माझ्या खोलीत ये आपण…” ‘तारक मेहता…’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा निर्मात्यांवर गंभीर आरोप, धक्कादायक खुलासा करत म्हणाली “मी गरोदर असताना…”

गौहरच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्माने तिला कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने “अभिनंदन, तुला आणि बाळाला खूप खूप प्रेम”, अशी कमेंट केली आहे.

दरम्यान गौहर खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केलं आहे. ती तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत असते. गौहर खान नुकतीच नेटफ्लिक्सवर ‘१४ फेरे की कहानी’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gauahar khan and zaid darbar welcome a baby boy see instagram post nrp