बिग बॉस ७’ची विजेती आणि बॉलीवूड अभिनेत्री गौहर खान सातत्याने चर्चेत असते. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. १० मे रोजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सध्या गौहर मातृत्वाचा आनंद घेत आहे. गौहर आणि जैद यांनी त्यांच्या मुलाच नाव जीहान असं ठेवलं आहे. नुकत्याच एक गौहरने तिच्या प्रसूती दरम्यानचा एक धक्कादायक खुलासा केला आहे.
गौहर म्हणाली, “जेव्हा मला प्रसूतीकळा सुरु झाल्या होत्या तेव्हा मी स्वत: गाडी चालवत रुग्णालयात गेले होते. जैद माझ्या बाजूलाच बसला होता. माझ्या नवऱ्याला माहिती होते की मला गाडी चालवायला आवडतं. त्यामुळे मी गरोदरपणात आणि प्रसूतीसाठी रुग्णालयात जातानाही गाडी चालवली. आम्ही चेकअपसाठी दवाखान्यात जात होतो. मी गाडी चालवत होते. तेव्हा मला अचानक प्रसूतीकळा सुरु झाल्या. ४.३० वाजता आम्ही रुग्णालयात पोहोचलो आणि ९.३० वाजता जीहानचा जन्म झाला.
प्रसूतीनंतर १८ दिवसांत गौहरचे वजन खूप कमी केले होते. गौहरने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो शेअर केला होता. फोटोत, अभिनेत्रीने पांढर्या स्लीव्हलेस टी-शर्टसह काळी पँट घातली आहे. फोटोत गौहर आपले कमी झालेले पोट दाखवताना दिसत होती. “नो फिल्टर १८ डेज पोस्टपार्टम.” अशी कॅप्शनही गौहरने स्टोरीला दिली होती.