मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गौहर खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेक विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असते. इतकंच नाही तर ती सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचा संपर्कात राहते. ती आपल्या आयुष्यातील अनेक अपडेट्सही शेअर करत असते. आता तिने ट्वीट करत फ्लाइटमध्ये चोरी झाल्याचं म्हटलं आहे.

“देशभक्तीचा दाखला…”, मुंबईतील कॉन्सर्ट रद्द झाल्यावर कॅनेडियन रॅपरचं स्पष्टीकरण; भारताबद्दल केलेली वादग्रस्त पोस्ट

गौहर खानने तिच्या ट्विटर हँडलवर एका पोस्टमध्ये सांगितलं की फ्लाइटमध्ये तिचे सनग्लासेस चोरीला गेले. विमान कंपनीने या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंतीही तिने केली. एअरलाइन्सला टॅग करत गौहर म्हणाली, “काल तुमच्या दुबई ते मुंबई या फ्लाइट ek508 मध्ये माझे सनग्लासेस चोरीले गेले. मी उतरले तेव्हा ते फ्लाइटमध्येच राहिले होते आणि मी त्याबाबत ताबडतोब इंडियन ग्राउंड स्टाफला माहिती दिली.”

“ते आधीच रस्त्यावर आले आहेत”, तनुश्री दत्ता नाना पाटेकरांचा एकेरी उल्लेख करत म्हणाली, “त्यांची लायकी…”

पुढे ती म्हणाली, “कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं की त्यांना माझ्या सीटच्या पॉकेटमध्ये सनग्लासेसची एक जोडी सापडली. पण त्यांनी मला आणून दिलेल्या पॅकेटमध्ये दुसरेच सनग्लासेस होते, जे माझे नव्हते. मी तुमच्या हेल्प लाइन नंबरवर अनेक वेळा कॉल केला आणि पुराव्यासह ईमेल पाठवला, पण प्रतिसाद मिळाला नाही. कृपया चोर शोधा कारण तुमच्या नामांकित एअरलाइनमध्ये कॅमेरे बसवलेले आहेत. तसेच तुमची एअरलाइन्स या सेवेसाठी मोठी रक्कम आकारते.”

gauhar khan tweet
गौहर खानचे ट्वीट

दरम्यान, गौहर खान सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने गोंडस मुलाला जन्म दिला. तिने २०२० मध्ये जैद दरबारशी लग्न केलं होतं. तिच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने ‘इशकज़ादे’, ‘बेगम जान’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. तसेच ती ‘बिग बॉस ७ ‘ची विजेती होती.

Story img Loader