बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘डिंकी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. किंग खान त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. शाहरुख खानप्रमाणे त्याची पत्नी गौरी खानही नेहमी चर्चेत असते. जगभरात ‘इंटिरियर डिझायनर’ म्हणून गौरीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहरुख खानने २५ ऑक्टोबर १९९१ रोजी गौरी खानशी लग्न केले. शाहरुख खान व गौरी हे बी-टाऊनचे लोकप्रिय कपल मानले जाते. शाहरुखची मुलगी सुहाना खाननेही नुकतेच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे, पण तुम्हाला माहित आहे का की गौरीच्या मते अभिनय क्षेत्र हे सर्वात वाईट प्रोफेशन आहे. गौरीने घरात काही नियम बनवले आहेत, हे नियम शाहरुख खानलाही पाळणे बंधनकारक आहे. नुकत्याच एका मुलाखतीत गौरीने याबाबचा खुलासा केला आहे.

नुकतंच गौरी खानने फिल्मफेअरला मुलाखत दिली या मुलाखतीत तिने वैयक्कित आयुष्याबाबतचे अनेक खुलासे केले आहेत. गौरी म्हणाली, “घरात आम्ही शाहरुखच्या कामाबद्दल कधीही चर्चा करत नाही. शाहरुख कधी हिंदी चित्रपटाचा व्हिडीओ बघायला बसला तर मला तो टिव्ही फोडावासा वाटतो. जर त्याने घरी कोणत्याही चित्रपटाची स्क्रिप्ट आणली तर ती सरळ मी खिडकीच्या बाहेर फेकून देते. या सगळ्या गोष्टी त्याला मी सेटवर करायला सांगितल्या आहेत. कारण सेटवर त्याच्याकडे भरपूर वेळ असतो.”

हेही वाचा- Video: नुपूर शिखरेला लग्नात शॉर्ट्स अन् बनियनवर पाहून आयरा खान म्हणाली, “Good Bye…”

मुंबईत राहण्याबाबतही गौरीने वक्तव्य केले आहे. गौरी म्हणाली, “मला मुंबईचा तिरस्कार आहे. मी इथे क्वचितच कोणाला ओळखत होते. सुरुवातीला मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत होते. नंतर सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या आणि हे शहर आवडायला लागलं. . शाहरुख ज्या निर्माते आणि दिग्दर्शकांबरोबर काम करत होता त्यांच्यापासून मी लांबच राहायचे. मुंबईत माझे काही मित्र होते मी त्यांच्याबरोबरच पार्टीला जायचे.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gauri khan reaction when shah rukh khan brought work home said i think will break television dpj
First published on: 04-01-2024 at 15:26 IST