बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानले जातात. ते दोघेही कायमच चर्चेत असतात. गौरी खानने बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. सध्या गौरी ही देशातील प्रसिद्ध इंटीरियर डिझायनरपैकी एक आहे. नुकतंच गौरी खानचे ‘माय लाईफ इन डिझाईन’ या कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आले.

गौरी खानच्या ‘माय लाईफ इन डिझाईन’ या कॉफी टेबल बुकचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या पुस्तकात खान कुटुंबियांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. या पुस्तकाचे काही फोटोही समोर आले होते. तेव्हापासूनच या पुस्तकाची प्रचंड उत्सुकता होती.
आणखी वाचा : Video : “याला म्हणतात संस्कार”, रितेश-जिनिलीयाच्या मुलांनी जिंकलेले गोल्ड मेडल गळ्यातून काढले अन्…

saif ali khan treatment at lilavati hospital who is dr nitin dange
सैफ अली खान ‘आऊट ऑफ डेंजर’! अभिनेत्याची शस्त्रक्रिया करणारे मराठमोळे डॉ. नितीन डांगे आहेत तरी कोण? मध्यरात्री केली धावपळ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Saif Ali Khan Attack
Saif Ali Khan : “फक्त सैफ अली खान याचं आडनाव खान आहे म्हणून…”, हल्ल्याबाबत गंभीर शंका घेणार्‍या आव्हाडांना गृहराज्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
Saif Ali Khan Attack News Saba Pataudi Shares health updates
सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण; बहीण सबा पतौडीने दिली हेल्थ अपडेट, पोस्ट शेअर करत म्हणाली…
ROHIT Pawar
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “प्रसिद्ध अभिनेत्याचं घर सुरक्षित नसेल तर…”
yograj singh criticise aamir khan movie
आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”

या कार्यक्रमाला अभिनेता शाहरुख खान उपस्थित होता. यावेळी काही प्रसारमाध्यमांनी गौरीला आर्यन खानबद्दल विचारले. त्यावर तिने फारच मजेशीर उत्तर देत आर्यन व्यस्त असल्याचे सांगितले. यावेळी ती म्हणाली, “माझ्या या पुस्तकातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कुटुंबाचा फोटो आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनसाठी मला शाहरुखची तारीख मिळवणं फार सोपं होतं. पण माझ्यासाठी आर्यनच्या तारखा मिळवणं फारच कठीण होतं. तो सध्या कामात फार व्यस्त आहे”, असे तिने सांगितले.

आणखी वाचा : गौरी खानने इंटिरिअर डिझाईनिंग करण्याचा निर्णय का घेतला? समोर आलं खरं कारण, शाहरुख म्हणाला “एक सोफा…”

दरम्यान गौरी खानने यापूर्वी ‘ड्रीम हाऊस विथ गौरी खान’ हा शो होस्ट केला होता. यात तिने अनेक कलाकारांची घरं पुन्हा डिझाइन केली होती. तसेच नेटफ्लिक्सच्या ‘फेब्युलस लाइफ ऑफ बॉलिवूड वाइव्हज’मध्ये तिने तिच्या डिझायनर स्टोअरची झलकही चाहत्यांना दाखवली होती.

Story img Loader