बॉलीवूडचा किंग खान शाहरुखने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. शाहरुखचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. शाहरुखचे अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता त्याच्या पत्नीचा म्हणजेच गौरीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
२००५ रोजी ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्या सीझनमध्ये जेव्हा गौरीने हजेरी लावली होती, तेव्हा लग्नानंतर धर्मांतर करण्याच्या विचाराबाबत तिने आपलं मत व्यक्त केलं होतं. याचाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये गौरी म्हणाली होती, “आर्यन खान शाहरुखला फॉलो करतो. मला असं वाटतं की, तो नक्कीच शाहरुखचा धर्म पाळेल. तो नेहमीच असं म्हणेल की मी मुस्लीम आहे. आर्यन जेव्हा याबद्दल माझ्या आईला सांगतो, तेव्हा माझी आई त्याला विचारते की, “याचा अर्थ काय आहे.”
हेही वाचा… जान्हवी कपूरने अफेअर आणि लग्नाच्या अफवांवर सोडल मौन; म्हणाली, “माझं लग्न…”
गौरी पुढे म्हणाली होती, “मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण त्याचा अर्थ असा नाही की मी धर्मांतर करून मुस्लीम होईन, माझा त्यावर विश्वास नाही. मला वाटतं की, प्रत्येक जण एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि ते त्यांच्या धर्माचं पालन करतात. पण, सहाजिकच कोणत्याही धर्माचा अनादर होता कामा नये. शाहरुख माझ्या धर्माचाही कधी अनादर करत नाही आणि करणारही नाही.”
काही वर्षांपूर्वी जेव्हा शाहरुख ‘डान्स प्लस ५’च्या सेटवर गेला होता तेव्हा तो म्हणाला होता, “आम्ही घरात कधी हिंदू-मुस्लीम अशी गोष्टच नाही केली. माझी पत्नी हिंदू आहे, मी मुसलमान आहे आणि माझी जी मुलं आहेत ती हिंदुस्थान आहेत. जेव्हा माझी मुलं शाळेत होती, तेव्हा फॉर्ममध्ये धर्म काय आहे हे भरायला लागायचं. जेव्हा माझी मुलगी लहान होती तेव्हा तिने मला येऊन एकदा विचारलं की, बाबा आपण कोणत्या धर्माचे आहेत. त्यात मी असं लिहिलं, आम्ही भारतीयच आहोत, इथे कोणता धर्म नाहीय आणि असायलापण नाही पाहिजे.”
दरम्यान, शाहरुख खान आणि गौरी यांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. या दोघांची पहिली भेट १९८४ मध्ये झाली होती. परंतु, शाहरुखचा धर्म मुस्लीम असल्याने गौरीच्या पालकांचा या लग्नाला विरोध होता. पण, अखेर गौरीचे पालक तयार झाले आणि २५ ऑक्टोबर १९९१ मध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला.