शाहरुख खानच्या ‘स्वदेस’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री गायत्री जोशी हिच्या कारचा इटलीमध्ये अपघात झाला. या अपघातात गायत्री आणि तिचा पती विकास ओबेरॉय दोघेही जखमी झाले. तर दुसऱ्या गाडीमध्ये असलेल्या एका स्विस जोडप्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी विकास ओबेरॉयची चौकशी केली जाणार आहे.
‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात
इटलीची न्यूज एजन्सी L’Unione Sarda ने दिलेल्या माहितीनुसार, विकास निळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी हुराकन गाडी चालवत होते. या रस्ते अपघातातील संशयितांच्या यादीत त्यांचं नाव आहे. या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर अपघात किती भीषण होता याचा अंदाज येतो. हा अपघात आपल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या जोडप्याने याबाबत अधिक माहिती दिली.
लोरेन्झो मस्करिन हे त्यांची पत्नी मरिना डेमेट्झसह कॅम्पर कारमधून प्रवास करत होते. तेव्हाच हा अपघात झाला. “आम्ही आमच्यासमोर मृत्यू पाहत होतो. आम्ही घाबरलो होतो आणि समोर नक्की काय घडतंय हेच आम्हाला कळत नव्हतं,” असं ६२ वर्षांच्या लोरेन्झो मस्करिन यांनी सांगितलं. ते सुटीसाठी सार्डिनियाला जात असताना हा भीषण अपघात झाला.
पुढे ते म्हणाले, “आम्ही जवळजवळ सॅन जिओव्हानी सुर्गीओला पोहोचलो होतो जेव्हा आम्हाला एक भयानक अपघात ऐकू आला आणि माझे कॅम्परवरील नियंत्रण सुटले. आमची गाडी उलटली. आम्ही क्षणभर सुन्न झालो होतो. मग मी माझ्या पत्नीकडे पाहिले आणि तिला विचारले की ती ठीक आहे का? तिने होकार दिला आणि आपण ठिक असल्यासारखं वाटतंय असं ती म्हणाली.