Genelia & Riteish Deshmukh : जिनिलीया व रितेश देशमुख या दोघांकडे मनोरंजनविश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. एकमेकांना जवळपास १० वर्षे डेट केल्यावर या दोघांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. आता या जोडप्याला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या दोघांनी नुकतीच शेअर केलेली एक इन्स्टाग्राम स्टोरी सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे.

फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीचे दोन आठवडे प्रेमाचे दिवस म्हणून साजरे केले जातात. यानंतर १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो. मात्र, रितेश-जिनिलीया इतर जोडप्यांप्रमाणे १४ तारखेला व्हॅलेंटाईन डे साजरा करत नाहीत. या दोघांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ १२ फेब्रुवारीला असतो. अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या स्टोरीमध्ये याबाबत खुलासा केला आहे.

व्हॅलेंटाईन डे १२ फेब्रुवारीला का साजरा करतात?

रितेश-जिनिलीयाची ( Genelia & Riteish Deshmukh ) पहिली भेट ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. १२ फेब्रुवारी २००२ रोजी त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाल्याचं त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे ही लोकप्रिय जोडी १४ ऐवजी १२ तारखेला व्हॅलेंटाईन डे साजरा करते.

आज त्यांच्या प्रेमाला २३ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अभिनेत्री लिहिते, “व्हॅलेंटाईन डे कशाला हवा… आपल्याकडे १२ फेब्रुवारीसारखा सुंदर दिवस आहे. रितेश २३ वर्षे झाली आणि पुढेही हा आकडा असाच वाढत जाईल.” पत्नीची ही पोस्ट रिशेअर करत रितेश म्हणतो, “२३ वर्षे झाली…लव्ह यू बायको”

Genelia & Riteish Deshmukh
जिनिलीया व रितेश देशमुख यांची इन्स्टाग्राम स्टोरी ( Genelia & Riteish Deshmukh )

दरम्यान, दोघांच्या ( Genelia & Riteish Deshmukh ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर रितेश लवकरच ‘हाऊलफुल्ल ५’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय जिनिलीया आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’मध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय रितेश सध्या त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटासाठी काम करत आहे. या सिनेमाची निर्मिती ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख मिळून करणार आहेत. वर्षाखेरीस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Story img Loader