Genelia Deshmukh : जिनिलीया व रितेश देशमुख यांची जोडी मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. रितेश – जिनिलीयाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधत आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. त्याआधी अनेक वर्षे हे दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. रितेश व जिनिलीयाकडे कलाविश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. या दोघांना रियान व राहिल अशी दोन मुलं आहे. आज रक्षाबंधन निमित्त अभिनेत्रीने तिच्या लाडक्या पुतणीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
देशमुख कुटुंबीय होळी असो किंवा गणपती प्रत्येक सण एकत्र साजरा करतात. याचप्रमाणे रक्षाबंधनाला देखील ही सगळी भावंडं एकत्र जमली होती. याचे खास फोटो जिनिलीयाला सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रितेश-जिनिलीयाची दोन्ही मुलं धिरज व दीपशिखा यांची मुलगी दिवीयानाबरोबर रक्षाबंधन साजरा करतात. देशमुखांच्या घरात सगळ्या भावांना दिवीयाना राखी बांधते. कारण, रितेशचे मोठे बंधू अमित देशमुख यांनाही दोन मुलं आहेत. त्यामुळेच “सगळे भाऊ लकी आहेत म्हणून त्यांना एवढी छान बहीण मिळाली” अशी पोस्ट जिनिलीयाने आपल्या पुतणीसाठी शेअर केली आहे.
हेही वाचा : “चुकीचे शब्द, लायकी काढणं…”, घराबाहेर आल्यावर योगिताची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “वर्षाताईंना खूप टार्गेट केलं”
देशमुखांच्या घरचं रक्षाबंधन
जिनिलीया ( Genelia Deshmukh ) लिहिते, “प्रिय दिवू…आम्ही तुला खूप प्रेम देऊ, तुझा कायम आदर करू… तुझं कायम रक्षण करू हे आमच्याकडून तुला वचन आहे. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा…तुझेच भाऊ रियान व राहिल”
देशमुखांच्या घरात प्रत्येक मराठी सण मोठ्या आनंदाने साजरा केले जातात. जिनिलीया ( Genelia Deshmukh ) मूळची महाराष्ट्रातली नसली तरीही लग्नानंतर तिने मराठी सण, परंपरा या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. अभिनेत्री प्रत्येक सण उत्साहात साजरा करते.
दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेता सध्या ‘बिग बॉस मराठी’चं होस्टिंग करत असून या शोला यंदा जोरदार टीआरपी मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय जिनिलीया सुद्धा लवकरच आमिर खानच्या ‘सितारें जमीन पर’ चित्रपटात झळकणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd