Genelia And Riteish Deshmukh : महाराष्ट्रात आज २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सामान्य लोकांपासून, मोठमोठे कलाकार ते दिग्गज नेते मंडळी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मनोरंजन विश्वातील लाडकी जोडी म्हणजेच रितेश-जिनिलीया यांनी देखील लातूर जाऊन मतदान केलं आहे. रितेश देशमुख हे मराठीसह बॉलीवूड कलाविश्वातील प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्याने कुटुंबीयांपेक्षा वेगळा मार्ग निवडत मनोरंजनसृष्टीत आपलं नशीब आजमावलं. मात्र, त्याचे दोन्ही भाऊ राजकारणात सक्रिय आहेत. लातूर येथील मतदान केंद्रावर जाऊन अभिनेत्याने कुटुंबीयांबरोबर मतदानाचा हक्क बजावला आहे.

Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

हेही वाचा : “आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं, आता पुढील पाच वर्षे…”, मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, पोस्ट करत म्हणाले…

रितेश देशमुख यावेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला, “नमस्कार आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, हा दिवस पाच वर्षांनी एकदा येतो. या दिवशी आपण ठरवतो की, आपण ज्या व्यक्तीला निवडून देणार आहोत ते सत्तेत जातील. पण, जे नवीन मतदार आहेत… जे पहिल्यांदा मतदान करतील त्यांना मी असं सांगू इच्छितो की, तुम्ही सर्वांनी पुढे येऊन भरभरून मतदान करा आणि योग्य उमेदवार निवडा.”

रितेशची पत्नी देखील यावेळी उपस्थित होती जिनिलीया म्हणाली, “मतदान करणं हा सर्वांचा अधिकार आहे. त्यामुळे सर्वांनी पुढे येऊन नक्की मतदान करा. तुमचं एक मत निर्णायक ठरू शकतं. त्यामुळे नक्की मतदान करा.”

हेही वाचा : घटस्फोटाच्या घोषणेनंतर ए आर रेहमान यांची पहिली पोस्ट; म्हणाले, “३० वर्षे पूर्ण करू अशी आशा होती, पण…”

हेही वाचा : २०२५ साठी शाहरुख खानची मोठी घोषणा! आर्यन करणार ‘या’ क्षेत्रात पदार्पण, तर पत्नी गौरी…; पोस्ट शेअर करत म्हणाला…

दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या ( Genelia And Riteish Deshmukh ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेता लवकरच ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटात झळकणार आहे. तर, अभिनेत्री जिनिलीया देशमुख लवकरच आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. प्रेक्षक या दोन्ही चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader