Genelia And Riteish Deshmukh : जिनिलीया आणि रितेश देशमुख यांच्याकडे बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या जोडप्याने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. रितेश-जिनिलीयाने ३ फेब्रुवारी २०१२ रोजी आधी मराठमोळ्या पद्धतीने आणि त्यानंतर ख्रिश्चन पद्धतीनुसार लग्न केलं होतं. जिनिलीयाने सासरी येऊन देशमुखांच्या परंपरा, मराठी संस्कृती, सण या सगळ्या गोष्टी अवघ्या काही महिन्यांतच आत्मसात केल्या. त्यांच्या घरी प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
गणेशोत्सव, दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरे केल्यावर आता रितेश-जिनिलीयाच्या घरी ख्रिसमस सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. यासाठी त्यांची दोन्ही मुलं ख्रिसमस ट्री सजवत असल्याचा व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रितेश-जिनिलीयाला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. हे दोघंही प्रत्येक सण मोठ्या आनंदाने साजरा करतात.
जिनिलीयाने शेअर केला खास व्हिडीओ
रियान आणि राहीलने गणोशोत्सवात आपला बाबा रितेश देशमुखच्या मदतीने गणपती बाप्पाची मूर्ती घरच्या घरीच घडवली होती. याशिवाय दिवाळीत सुद्धा या दोन्ही मुलांनी हौसेने संपूर्ण घरात सजावट केली होती. आता रियान आणि राहील ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर सुंदर असा ख्रिसमस ट्री सजवत असल्याचं पाहायला मिळत आहे.
जिनिलीयाने ( Genelia And Riteish ) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचा मोठा मुलगा आणि रितेश दोघे मिळून ख्रिसमस ट्री वरच्या बाजूने सजवून, व्यवस्थित सगळं डेकोरेशन झालंय की नाही… यावर नजर मारताना दिसत आहेत. तर, धाकटा मुलगा राहील यावेळी ख्रिसमस ट्रीच्या खालील बाजूस सजावट करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. जिनिलीयाने हा व्हिडीओ शेअर करत यावर “हळुहळू ख्रिसमस सेलिब्रेशनची सुरुवात होतेय” असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, रियान आणि राहील यांच्या संस्कारांचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक केलं जातं. रितेश-जिनिलीयाची ( Genelia And Riteish ) मुलं पापाराझींसमोर नेहमीच हात जोडून नमस्कार करत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच रितेश देशमुखचं कुटुंब, हे मनोरंजन विश्वात सर्वांचं लाडकं कुटुंब आहे.