Genelia And Riteish Deshmukh : जिनिलीया व रितेश देशमुखकडे बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. हे दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. गेल्या काही दिवसांपासून शूटिंगनिमित्त रितेश परदेशात होता. आता अभिनेता पुन्हा एकदा भारतात परतल्याने रितेश-जिनिलीयाची धमाल नव्याने सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
रितेश-जिनिलीया ( Genelia And Riteish ) सोशल मीडियावर विविध रील्स आणि डान्स व्हिडीओ शेअर करत त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. महाराष्ट्राचे लाडके ‘दादा वहिनी’ म्हणून या दोघांना ओळखलं जातं. नुकताच या दोघांनी आपल्या मित्रमंडळींसह भन्नाट डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.
कतरिना कैफचं ‘चिकनी चमेली’ गाणं २०११ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. रितेश-जिनिलीया आपल्या मित्रमंडळींबरोबर याच ‘चिकनी चमेली’ गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळत आहे. जेनिफर विंगेट, कांची कौल, आशिष चौधरी, शब्बीर अहलूवालिया, मुश्ताक शेख, समिता बांगर्गी हे सगळे कलाकार रितेश-जिनिलीयाबरोबर या व्हिडीओमध्ये जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
अवघ्या तासाभरात ३५ लाखांहून अधिक व्ह्यूज
रितेश-जिनिलीयाच्या ( Genelia And Riteish ) या भन्नाट व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या डान्स व्हिडीओला अवघ्या तासाभरात तब्बल ३५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी कमेंट्सचा देखील पाऊस पाडला आहे. “वहिनी लय भारी”, “याला म्हणतात खरा वेडेपणा…तुम्ही मस्त एंजॉय करता”, “रितेश भाऊ कमाल”, “आम्हाला असे मित्र का नाहीत?”, “दहा वेळा तरी हा व्हिडीओ आम्ही पाहिलाय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
हेही वाचा : गौहर खानचा एक्स बॉयफ्रेंड १३ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात, कबुली देत लग्नाबाबत म्हणाला, “मी हे नातं…”
दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या ( Genelia And Riteish ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर आता अभिनेता लवकरच ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटात झळकणार आहे. तसेच जिनिलीया देशमुख लवकरच आमिर खानबरोबर ‘सितारे जमीन पर’ या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.