Genelia And Riteish Deshmukh : अलीकडच्या काळात सोशल मीडियावर अनेक गाणी व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून ‘तांबडी चामडी’ या गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ-मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी या ट्रेडिंग गाण्यावर व्हिडीओ बनवले आहेत. आता या व्हायरल गाण्याची भुरळ रितेश-जिनिलीयाला देखील पडली आहे.

‘तांबडी चामडी’ हे गाणं ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्हणणारा लोकप्रिय डीजे क्रेटेक्स म्हणजेच मराठमोळ्या कृणाल घोरपडेने संगीतबद्ध केलं आहे. अगदी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात क्रेटेक्सने एन्ट्री घेतल्यावर सुद्धा हे गाणं वाजवलं होतं. आता या लोकप्रिय गाण्यावर रितेश व जिनिलीया आपल्या मित्रमंडळीसह थिरकले आहेत.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
genelia and riteish deshmukh enjoy bali trip
मिस्टर अँड मिसेस देशमुख पोहोचले इंडोनेशियात! जिनिलीयाने दाखवली बालीमधल्या निसर्गरम्य वातावरणाची झलक, पाहा फोटो…
bigg boss marathi nikki tamboli and arbaz patel video call
निक्की तांबोळीने केला सूरज चव्हाणला Video कॉल! सोबतीला होता अरबाज; म्हणाली, “भावा लवकरच…”
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
madhuri dixit mumbai home inside photos
माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर आतून कसं दिसतं? पाहा ५३ व्या मजल्यावरील अपार्टमेंटचा Inside Video

हेही वाचा : Video : “नुसतं प्रेम भावा…”, म्हणत परदेसी गर्ल पोहोचली कोल्हापुरात! घरी येताच धनंजय पोवारच्या आई अन् पत्नीने औक्षण

‘तांबडी चामडी’ गाण्यावर जबरदस्त डान्स

रितेश-जिनिलीयाकडे बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. दोघांचाही चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या दोघांच्या रील्स व्हिडीओवर नेटकरी भरभरून प्रतिसाद देतात. याशिवाय त्यांचे विनोदी, डान्स करतानाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. रितेश व जिनिलीयाने ( Genelia And Riteish ) काही दिवसांपूर्वीच आपल्या मित्रमंडळींबरोबर ‘चिकनी चमेली’ गाण्यावर डान्स केला होता. आता या जोडप्याने पुन्हा एकदा त्यांच्या सगळ्या मित्रांबरोबर धमाल केली आहे. ‘तांबडी चामडी’ गाण्यावर रितेश देशमुख, जिनिलीया, जेनिफर विगेंट, कांची कौल, आशिष चौधरी, शब्बीर अहलूवालिया, मुश्ताक शेख, समिता बंगार्गी या सगळ्यांनी मिळून जबरदस्त डान्स केला आहे.

रितेशने या व्हिडीओला “आमच्या गँगबरोबर लका लका…” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रत्येक सेलिब्रिटीचा अनोखा स्वॅग पाहायला मिळत आहे. तर, यामध्ये नेहमीप्रमाणे जिनिलीयाची ( Genelia And Riteish ) तुफान एनर्जी सर्वांचं लक्ष वेधून घेते.

हेही वाचा : काय गं सखू, बोला दाजिबा! दादा कोंडकेंच्या सुपरहिट गाण्यावर प्रथमेश परबचा मॉडर्न अंदाज; सोबतीला आहे पत्नी, पाहा व्हिडीओ

रितेश व जिनिलीया देशमुखच्या ( Genelia And Riteish ) या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “मराठीच वाजणार”, “रितेश जिनिलीया जबरदस्त”, “दादा वहिनी कमाल”, “तुमची पूर्ण गँगच भारीये”, “या मित्रमंडळींना खूप प्रेम कोणाची नजर लागू नये” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत १४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader