Genelia and Riteish Deshmukh Funny Video : जिनिलीया व रितेश देशमुख हे दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. या जोडीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मराठीसह बॉलीवूडमध्ये रितेश-जिनिलीयाकडे एक आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. तेव्हापासून या दोघांना महाराष्ट्राचे लाडके ‘दादा-वहिनी’ म्हणून ओळखलं जातं. यांनी इन्स्टाग्रामवर नुकताच शेअर केलेला एक मजेशीर व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

रितेश-जिनिलीया रोमँटिक व्हिडीओ, पोस्ट याचबरोबर अनेकदा मजेशीर व्हिडीओ शेअर करून आपल्या चाहत्यांना खळखळून हसवत असतात. लग्नानंतर नवरा-बायकोमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींमुळे वाद होत असतात. पण, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीप्रमाणे नेहमीच नवऱ्याला बायकोचं ऐकावं लागतं. रितेशचं सुद्धा असंच काहीसं होतं. यावरूनच या दोघांनी ट्रेडिंग ऑडिओ वापरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Girlfriend boyfriend kiss video viral obscene video of one girl and two young man went viral on social media
“अगं जरा तरी भान ठेव”, भररस्त्यात एकाला केलं किस अन्…, दोन तरुणांबरोबर तरुणीचे अश्लील चाळे! VIDEO पाहून कपाळावर माराल हात
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video
video of true two school friend met after 5 years
VIDEO : तब्बल पाच वर्षानंतर जिवलग मैत्रीणी भेटल्या अन् मिठी मारून ओक्साबोक्शी रडल्या; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण

हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर तो क्षण आलाच! प्रतिमा अन् रविराज किल्लेदार आले समोरासमोर पण…; पाहा मालिकेचा नवीन प्रोमो

जिनिलीया व रितेश यांचा व्हिडीओ चर्चेत ( Genelia and Riteish )

जिनिलीया या व्हिडीओमध्ये म्हणते, “नवरा- बायकोच्या जोड्या वरच जुळतात” यावर रितेश म्हणतो, “हो फक्त भांडणं करण्यासाठी या जोड्या खाली येतात” नवऱ्याचं हे उत्तर ऐकून अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात अन् ती रितेशकडे रागाने पाहते. यानंतर आपण हे काय बोलून गेलो असा विचार करून रितेश डोक्यावर हात मारून घेतो असं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा मूळ ऑडिओ हिंदी भाषेत आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने घेतली पहिली गाडी! सोबतीला होते आई अन् कुटुंबीय; म्हणाला, “संयमाची चार चाके…”

जिनिलीया-रितेशच्या ( Genelia and Riteish ) या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. नवऱ्याने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून जिनिलीया कमेंट्समध्ये लिहिते, “मला कळत नाहीये तू माझं कौतुक करतोय की, तक्रार करत आहेस” तर, इतर काही युजर्सनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : नवीन होस्ट असणार रितेश देशमुख! ५ वा सीझन केव्हा सुरू होणार व कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही…

Genelia and Riteish
नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Genelia and Riteish )

“वहिनी दादांचं म्हणणं खरं आहे”, “मुली नेहमीच भांडण करण्यात पुढे असतात”, “रितेश दादा एवढं खरं नव्हतं बोलायचं”, “दादासाहेब व वहिनीसाहेब”, “दोघंही कमाल आहेत” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी रितेश-जिनिलीयाच्या या मजेशीर व्हिडीओवर केल्या आहेत.

Story img Loader