Genelia and Riteish Deshmukh Funny Video : जिनिलीया व रितेश देशमुख यांची जोडी मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर रितेश-जिनिलीयाच्या पहिली भेट झाली होती. यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. चित्रपटांव्यतिरिक्त दोघंही इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. सध्या या जोडप्याने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

जिनिलीया व रितेश देशमुख यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. हा मूळ ऑडिओ हिंदीमध्ये आहे. यामध्ये जिनिलीया रितेशला म्हणते, “ऐका आता गाण्याची एक ओळ मी गाते आणि एक ओळ तुम्ही गा” अभिनेता बायकोच्या सांगण्याला अनुमोदन देत मान डोलावतो. यानंतर जिनिलीया शाहरुख-काजोलचं लोकप्रिय “जाती हूँ मैं…” हे गाणं गाते. जिनिलीयाने “जाती हूँ मैं” गायल्यावर पुढे रितेशने “जल्दी है क्या” ही ओळ म्हणणं अपेक्षित असतं. पण, एवढ्यात अभिनेता गाण्याची ओळ ट्विस्ट करत “जल्दी तू जा” असं म्हणतो. यानंतर ऑडिओच्या बॅकग्राऊंडला एकच हशा पिकतो.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल

हेही वाचा : “फिल्मी क्षेत्रातल्या महिला मैत्रिणी होऊ शकत नाहीत, एकमेकींवर जळतात”, आशा भोसलेंचं स्पष्ट मत; म्हणाल्या…

व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस ( Genelia and Riteish Deshmukh )

रितेशने “जल्दी तू जा” गायल्यावर जिनिलीया त्याच्याकडे रागाने बघते. यावर लगेच अभिनेता “जल्दी है क्या” ही मूळ ओळ म्हणतो. यानंतर रितेश गमतीत डोक्यावर हात मारून घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. या मराठमोळ्या जोडप्याच्या या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

प्रिया बापटने या व्हिडीओवर हसायचे इमोजी कमेंटमध्ये दिले आहेत. याशिवाय अन्य काही नेटकऱ्यांनी “तुम्ही दोघं बेस्ट आहात”, “अब होगा महाभारत”, “एकदम परफेक्ट कपल”, “जगातील सुंदर जोडी”, “फेव्हरेट कपल” अशा कमेंट्स या व्हिडीओवर केल्या आहेत.

हेही वाचा : “मी दर महिन्याला त्याच्याबरोबर ब्रेकअप करायचे आणि…”, जान्हवी कपूरचा शिखर पहारियाबरोबरच्या नात्यावर खुलासा

genelia
जिनिलीया व रितेश देशमुख यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस ( Genelia and Riteish Deshmukh )

दरम्यान, रितेश – जिनिलीच्या ( Genelia and Riteish Deshmukh ) या मजेशीर व्हिडीओवर अवघ्या दोन दिवसांतच तब्बल ५८ मिलियनहून अधिक व्ह्यूज आले आहेत. दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर या जोडप्याला रियान व राहील अशी दोन मुलं आहेत.

Story img Loader