रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि जिनिलीया देशमुख(Genelia Deshmukh) हे प्रेक्षकांचे लाडके सेलिब्रिटी जोडपे आहे. महाराष्ट्रात त्यांना अगदी प्रेक्षकांकडूनही दादा-वहिनी असेच संबोधले जाते. विविध कार्यक्रम आणि पुरस्कार सोहळ्यांना जेव्हा रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हजेरी लावतात, तेव्हा ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. एकमेकांसाठी त्यांचे असणारे प्रेम हा चाहत्यांसह कलाकारांच्यादेखील कौतुकाचा विषय असतो, हे वेळोवेळी पाहायला मिळते. मात्र, याचबरोबर त्यांना एकमेकांप्रति असलेला आदर चाहत्यांना अधिक भुरळ घालतो. याशिवाय या जोडप्याच्या मुलांचीदेखील अनेकदा चर्चा रंगताना दिसते. ज्या प्रकारे रितेश आणि जिनिलीयाची मुले मीडियासमोर वागतात, त्याचे मोठे कौतुक होताना दिसते. आता मात्र रितेश आणि जिनिलीयाच्या हुडीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
र
जिनिलीया आणि रितेश देशमुख ‘या’ कारणांमुळे चर्चेत
रितेश व जिनिलीया देशमुखने मीडियासमोर फोटोसाठी पोज दिली. व्हायरल भयानी (Viral Bhayani)ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश व जिनिलीयासह त्यांच्या दोन्ही मुलांनी हात जोडल्याचे पाहायला मिळाले. या दरम्यान एक लहान मुलगाही फोटोमध्ये येतो आणि तो मीडियासमोर हात हलवताना दिसत आहे. त्यावेळी रितेश त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आहे. शेवटी त्यांच्या गाडीकडे जाण्यासाठी ते वळतात, तेव्हा त्यांच्या हुडीवर लिहिलेले शब्द लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. रितेशच्या हुडीवर बाबा आणि जिनिलीयाच्या हुडीवर आई असे शब्द लिहिलेले दिसत आहेत.
ा
हे जोडपे त्यांच्या मुलांना नेहमी प्रोत्साहन देत असते. अनेकदा सोशल मीडियावर मुलांबरोबरचे व्हिडीओदेखील ते शेअर करतात. गणपती उत्सवाच्यावेळी रितेश मुलांसह गणपतीची मूर्ती बनवत असल्याचे पाहायला मिळाले होते. याबरोबरच अनेकदा त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमधून भावंडांमधील प्रेमही पाहायला मिळते. जिनिलीया त्यांच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गमतीजमती सोशल मीडियावर शेअर करत असते.
हेही वाचा: Video: शाई लावलेले बोट दाखवा म्हटल्यावर सलमान खानने…; बॉलीवूडच्या भाईजानचा हटके अंदाज, पाहा व्हिडीओ
दरम्यान, जिनिलीया आणि रितेश देशमुख दोघेही विनोदी, चाहत्यांना हसणाऱ्या रील्स बनवत असतात आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. रितेश देशमुख काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी ५’चे सूत्रसंचालन करताना दिसला होता. आता तो लवकरच ‘रेड २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.