Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding In Jamnagar : रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये आजपासून ( १ मार्च २०२४ ) ते ३ मार्चपर्यंत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी जामनगरमध्ये संपूर्ण सिनेसृष्टी अवतरल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल कपूर, शाहरुख खान, सैफ अली खान असे बॉलीवूडचे बडे स्टार्स अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी जामनगरमध्ये दाखल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याचं निमंत्रण कलाविश्वापासून ते क्रिकेटविश्वातील मान्यवरांपर्यंत प्रत्येकाला देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे व कुटुंबीय, मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस असे राजकीय क्षेत्रातील मान्यवर सुद्धा प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला पोहोचले आहेत. सध्या या सगळ्यांचे व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सगळ्या पाहुण्यांचं जामनगरमध्ये जंगी स्वागत होत असल्याचं या व्हिडीओजमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : लग्नानंतर पूजा सावंत-सिद्धेश चव्हाण यांनी जोडीने केली सत्यनारायण पूजा! बहिणीने शेअर केला खास फोटो

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेने देखील प्री-वेडिंग सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अशातच विमानतळावर महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी रितेश-जिनिलीया यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पापाराझींना नमस्कार करून अभिनेत्रीने यावेळी पोज दिल्या.

हेही वाचा : प्रार्थना बेहेरेने पतीसह बांधली पूजा-सिद्धेशची लग्नगाठ! लाडक्या मैत्रिणीच्या लग्नात अभिनेत्री झालेली भावुक, म्हणाली…

रितेश-जिनिलीयाला पाहून पापाराझींनी त्यांना “दादा-वहिनी”, “दादा… जय महाराष्ट्र” अशा हाका मारून मराठीत संवाद साधला. सध्या या जोडप्याच्या व्हिडीओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान, प्री-वेडिंग कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अंबानी कुटुंबाकडून जामनगरमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाहुण्यांसाठी खास आलिशान तंबू उभारण्यात आले आहेत. या तंबूमध्ये सोफा, बेड, फ्रीज, टीव्हीपासून, एसीपर्यंतच्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Genelia and riteish deshmukh madhuri dixit reach jamnagar for anant ambani radhika merchant pre wedding function sva 00