Genelia Deshmukh Birthday : आपल्या सहज – सुंदर अभिनयाने सर्वांना भुरळ घालणाऱ्या जिनिलीया देशमुखचा आज ३७ वाढदिवस. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून जिनिलीयाने हिंदी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. तिने या चित्रपटात पहिल्यांदाच रितेशबरोबर स्क्रीन शेअर केली होती. ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये मैत्री झाली अन् पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन रितेश – जिनिलीयाने लग्नगाठ बांधली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकमेकांना जवळपास १० वर्षे डेट केल्यावर जिनिलीया – रितेश २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले. या दोघांकडे मराठीसह बॉलीवूडमधली आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. रितेश-जिनिलीयाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आज पत्नीच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर करत बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : नवरा माझा नवसाचा २ : सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित! सचिन पिळगांवकर म्हणाले, “गणपतीपुळ्याचे प्रवासी कन्फर्म…”

रितेशने यंदा जिनिलीयाच्या वाढदिवसानिमित्त मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. लग्नाच्या आधी नवऱ्याचं प्रेम अन् लग्नानंतरचं प्रेम अशा दोन भागांमध्ये अभिनेत्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सुरुवातीला लग्नाआधीच्या प्रेमात “तुम सा कोई प्यारा, कोई मासूम नहीं है” हे गाणं बॅकग्राऊंडला वाजतं. तर, लग्नानंतर “तुमने मेरी जिंदगी खराब की है” हे गाणं लागतं. यात रितेश जिनिलीयाची सेवा करत असल्याचं पाहायला मिळतंय. हा मजेशीर व्हिडीओ रितेश – जिनिलीयाच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi: “आज स्वतःसाठी उभा राहा…”, विशाखा सुभेदारची ‘बिग बॉस मराठी’मधील ‘या’ सदस्यासाठी पोस्ट, म्हणाली, “दाखवून दे…”

जिनिलीयासाठी रितेशची खास पोस्ट ( Genelia Deshmukh )

रितेशने हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला असला तरी याला अभिनेत्याने रोमँटिक कॅप्शन दिलं आहे. “Happy Birthday बायको…जिनिलीया तू माझं आयुष्य पूर्णपणे बदललं आहेस” असं रितेशने म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट्स करत अभिनेत्रीला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील नव्या मिहिकाने खऱ्या आयुष्यातील नवऱ्यासाठी केली खास पोस्ट, म्हणाली, “तू अल्लड आणि निर्मळ…”

रितेश – जिनिलीया ( Genelia Deshmukh )

दरम्यान, जिनिलीया देशमुख ( Genelia Deshmukh ) आता लवकरच ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानच्या ‘सितारें जमीन पर’ चित्रपटात झळकणार आहे. आज संपूर्ण मनोरंजन विश्वातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Genelia deshmukh birthday riteish shared special post for wife sva 00