जिनिलीया देशमुख ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीने हिंदीसह मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या जिनिलीयाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्रीने केलेल्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : “तू दूर का, अशी तू…”, ओंका भोजनेची कविता ऐकून भर कार्यक्रमात नम्रता संभेराव झाली भावुक

Heart touching video of police who help poor man on road video goes viral
“शेवटी हिशोब कर्माचा होतो” पोलिसानं गरीब रिक्षा चालकाबरोबर काय केलं पाहा; VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Woman slaps Telugu actor NT Ramaswamy
Video: …अन् महिलेने भर गर्दीत अभिनेत्याला केली मारहाण, चित्रपट ठरला कारणीभूत; व्हिडीओ झाला व्हायरल
Viral video rickshaw driver writes interesting question on backside of rickshaw viral
VIDEO: पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता? कोल्हापुरच्या रिक्षा चालकानं लिहलं भन्नाट उत्तर; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
A cow ran over a man funny video
‘शेवटी बाईचं मन…’ चारा खायला दिला नाही म्हणून गायीने केलं असं काही… VIDEO पाहून येईल हसू
The sister cried out for her brother Video Viral
‘दादा तू परत ये ना..’ पाण्यात उडी मारणाऱ्या भावासाठी बहिणीने केला आक्रोश; हृदयस्पर्शी Video Viral
Littele boys took blessings from cow heart touching video
“शेवटी पेराल तेच उगवणार” लहान मुलांच्या एका कृतीनं जिंकली लाखो लोकांची मनं; VIDEO पाहून कळेल संस्कार किती महत्त्वाचे
priyanka chaturvedi praised pm narendra modi
Video: “मोदीजी सर्वात ग्रेट राजकारणी”, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; नेमकं घडतंय तरी काय?

जिनिलीया शुक्रवारी दुपारी आपल्या मैत्रिणींबरोबर वांद्र्यातील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली होती. याच दरम्यानचा तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेस्टॉरंटमधून बाहेर आल्यावर जिनिलीया तिच्या गाडीची वाट पाहत उभी होती. यावेळी रस्त्यावर उभी असणारी दोन मुलं “तू हिरोईन आहेस ना?” असं म्हणत तिच्या दिशेने येऊ लागली. त्यांचा आवाज ऐकताच जिनिलीया त्यांच्याजवळ आली आणि अभिनेत्रीने हसत-खेळत त्यांची विचारपूस करू केली.

हेही वाचा : भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकरने शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली, “तुला गमावण्याचं दुःख…”

“तुम्ही मला कसं ओळखता?”, “माझा कोणता चित्रपट पाहिलात? मला नाव सांगा…” असे अनेक प्रश्न अभिनेत्रीने त्या मुलांना विचारले. याशिवाय जिनिलीयाने त्या दोन्ही मुलांची चौकशीदेखील केली. एवढंच काय, तर गाडीची वाट असताना तिने यामधील एका लहान मुलीचा हात धरला होता. जिनिलीयाचा हा व्हिडीओ पिंकव्हिला या पापाराझी पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : Video: ‘मेरा पिया घर आया’ गाण्याचं येणार 2.0 व्हर्जन, सनी लिओनी दिसणार बोल्ड अंदाजात, प्रतिक्रिया देत माधुरी दीक्षित म्हणाली…

जिनिलीयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. देशमुखांच्या सुनेवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. “जिनिलीया मनाने खरंच चांगली आहे”, “आमच्या वहिनीसाहेब”, “तिच्याऐवजी दुसरी कोणी अभिनेत्री असती, तर त्या मुलांच्या बाजूला थांबलीदेखील नसती”, “जिनिलीया-रितेश दोघेही सामान्य लोकांप्रमाणे वागतात…खूप चांगले आहेत” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर जिनिलीया नुकतीच ‘ट्रायल पीरेड’ चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट २१ जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.