Genelia Deshmukh : संपूर्ण देशभरात सध्या नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत असे नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी देवीची नऊ रूपं आहेत; ज्यांचं नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पूजन केलं जातं. प्रत्येक दिवशी विशिष्ट रंगाला महत्त्व असतं. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांत सर्वत्र प्रसन्न करून टाकणारं वातावरण पाहायला मिळतं. सामान्य लोकांप्रमाणे मनोरंजन विश्वातील कलाकार सुद्धा मोठ्या आनंदाने हा सण साजरा करतात. जिनिलीयाने नुकतीच देशमुखांच्या घरच्या नवरात्रोत्सवाची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली जाते.
जिनिलीया ( Genelia Deshmukh ) मुळची महाराष्ट्रातली नसली तरीही देशमुखांच्या घराच्या परंपरा, मराठी सण ती मोठ्या आवडीने साजरे करते. आषाढी एकादशी असो किंवा गणेश चतुर्थी प्रत्येक सणाला देशमुखांची सून पुढाकार घेऊन तिच्या सासूबाईंसह पूजाअर्चा करते.
जिनिलीयाने सासूबाईंसह केली पूजा
सध्या देशमुखांच्या घरी शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने त्यांच्या घरी घटस्थापना करण्यात आली आहे. याची खास झलक अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. जिनिलीयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिची सासू आणि रितेशच्या आई वैशाली देशमुख पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
जिनिलीयाने नवरात्रोत्सवाचा व्हिडीओ शेअर करत याला “आईबरोबर घटस्थापना” असं कॅप्शन दिलं आहे. रितेश सध्या शूटिंगनिमित्त बाहेरगावी असल्याने अभिनेत्रीने ( Genelia Deshmukh ) सासूबाईंसह पूजा केल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेता आता थेट ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेसाठी मुंबईत येणार आहे.
हेही वाचा : Bigg Boss 18 House Tour: गुहेसारखं स्वयंपाकघर, तर किल्ल्यासारखी बेडरूम, पाहा बिग बॉसच्या घराची पहिली झलक
हेही वाचा : ‘बिग बॉस मराठी’ने रचला इतिहास! शेवटच्या आठवड्यात रेकॉर्डब्रेक TRP; ‘कलर्स मराठी’ने शेअर केली खास पोस्ट
दरम्यान, जिनिलीया देशमुखबद्दल ( Genelia Deshmukh ) सांगायचं झालं, तर तिने आजवर अनेक बॉलीवूड व दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्रीने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटातून मराठी कलाविश्वात पाऊल ठेवलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता लवकरच जिनिलीया आमिर खानबरोबर ‘सितारें जमीन पर’ चित्रपटात झळकणार आहे.