अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलीया देशमुख ही जोडी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. हिंदी, मराठी, दाक्षिणात्य अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केल्याने तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिचे मराठी फॅन्स अनेकदा तिला वहिनी अशी हाक मारतात. आता चक्क एका फोटोग्राफरने सर्वांसमोर तिला वहिनी अशी हाक मारली. त्यावर जिनिलीयाने देखील प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस नेते, माजी आमदार बाबा सिद्दिकी यांनी मुंबईत इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलीवूडमधील बड्या स्टार्सनी हजेरी लावली. या पार्टीला रितेश आणि जिनिलीयाही उपस्थित होते. या पार्टीदरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीला रितेश आणि जिनिलीया पोहोचतात रितेशने बाबा सिद्दिकी यांनी त्या दोघांचं स्वागत केलं. तर एंट्रीला बाबा सिद्दिकी यांनी त्यांच्याबरोबर फोटोही काढला. त्यांचा फोटो काढून झाल्यावर बाबा सिद्दिकी बाजूला झाले आणि फोटोग्राफर रितेश जिनिलीयाकडे फोटोसाठी पोझ देण्याची मागणी करू लागले. रितेश आणि जिनिलीयाने देखील हसत हसत फोटोग्राफर्सची मागणी मान्य केली आणि फोटोंना पोझ दिल्या. तर यावेळी एका फोटोग्राफरने जिनिलीयाला वहिनी अशी हाक मारली. ही हाक ऐकू आल्यावर जिनिलीयाचं लक्ष लगेच त्या फोटोग्राफरकडे गेलं. तिने फोटोग्राफरकडे पाहिलं आणि ती खळखळून हसली.
आणखी वाचा : …आणि जिनिलीया देशमुखने मानले सायली संजीवचे हात जोडून आभार, जाणून घ्या नक्की काय झालं
आता त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर तिथे चाहते कमेंट करत जिनिलीयाचा हा क्युट आणि नम्र अंदाज आवडल्याचं सांगत तिचं कौतुक करत आहेत.