अभिनेत्री जिनिलीया देशमुखला नाव बदलण्याचा सल्ला मिळाला होता, यासंदर्भात तिने खुलासा केला आहे. काही चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये नाव बदलण्यास सुचवलं होतं, परंतु तिने नकार दिला होता. जिनिलीया हे नाव उच्चारण्यास कठीण असल्याचं त्यांचं म्हणणं होतं, पण तिने नाव बदललं नाही.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत जिनिलीया म्हणाली,“जेव्हा मी चित्रपटसृष्टीत आले तेव्हा लोकांनी मला माझे नाव बदलायला सांगितले. मला माहीत नाही की ते काय विचार करत होते पण ते म्हणाले होते की ‘लोकांना जिनिलीया उच्चार करणे कठीण जाईल’. पण मी म्हणाले, ‘ते माझे नाव आहे’. आता मला प्रत्येकजण त्या नावाने हाक मारतो, त्यामुळे नाव बदलण्याचा सल्ला मी ऐकला नाही त्याचा मला आनंद आहे.”
प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, गर्लफ्रेंडने दिला बाळाला जन्म; फोटो पोस्ट करत म्हणाला…
तिला काही नाव सुचवलं गेलं होतं का? असं विचारले असता, तिने सांगितलं की तिला तिचे नाव बदलून ‘जीना’ ठेवण्यास सांगितलं गेलं होतं. जिनिलीयाने २० वर्षांपूर्वी २००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुखबरोबर स्क्रीन शेअर केली होती, नंतर दोघे प्रेमात पडले आणि लग्नही केलं. त्यांच्या लग्नाला आता १० वर्षांहून अधिक काळ झाला आहे.
‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकर पतीपासून घटस्फोट घेणार?
२००८ मध्ये आलेल्या ‘जाने तू जाने ना’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांच्या अफेअरची खूप चर्चा होती, तेव्हाही या जोडप्याने नातं स्वीकारलं नव्हतं. त्याबद्दल जिनिलीया म्हणाली, “मला वाटतं की त्यावेळी आमचं नातं कुठे चाललं होतं, आहे हे आम्हालाही माहीत नव्हतं. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल खात्री होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याबद्दल बोलणं योग्य नाही, असं मला वाटतं. आम्हाला गोष्टी कॉम्प्लिकेट करायच्या नव्हत्या कारण नात्यात आम्ही कुठे जात आहोत हे आम्हालाही माहीत नव्हतं.”
जिनीलीया लवकरच ‘ट्रायल पीरियड’ नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. यात मानव कौलचीही महत्त्वाची भूमिका आहे. यात जिनिलीया लहान मुलाच्या आईची भूमिका साकारत आहे. तर, मानव कौल त्या मुलासाठी तात्पुरत्या स्वरुपात बोलावलेल्या बाबाची भूमिका करणार आहे.