अभिनेता रितेश आणि जिनिलीया देशमुखची जोडी प्रेक्षकांना फार आवडते. अनेकवर्ष एकमेकांना डेट केल्यावर दोघांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधून आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. सध्या जिनिलीया तिच्या ‘ट्रायल पीरियड’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जिनिलीयाने रितेशबरोबरचे नाते, ते दोघेही घरी एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारतात याबद्दल खुलासा केला आहे.
‘झूम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जिनिलीया म्हणाली, “रितेश मला फार पूर्वीपासून ‘जीन्स’ या नावाने हाक मारायचा. हे नाव ऐकून माझ्या सासूबाई सुरुवातीला गोंधळून गेल्या होत्या. त्यांना वाटायचे हा जिनिलीयाला ‘जीन्स’ का बोलत असेल. त्यांना कदाचित कपड्याची जीन्स वाटत असेल… एकंदर ‘जीन्स’ या नावामुळे सुरुवातीला आमच्या घरी असा सगळा गोंधळ निर्माण झाला होता.”
हेही वाचा : “पुणे-मुंबई प्रवास करणार असाल तर…”, मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत; म्हणाली, “संपूर्ण घाट…”
जिनिलीयाला पुढे, “तू रितेशला प्रेमाने काय बोलतेस?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, “मी फार कमीवेळा याबाबत बोलले आहे. मी रितेशला प्रेमाने डोलू (Dollu) म्हणते. मला खरंच आठवत नाही, या नावाने मी त्याला केव्हापासून हाक मारू लागले. पण, आता खूप वर्ष झाली मी रितेशला याच नावात हात मारतेय.”
हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’ नाकारणाऱ्या निर्मात्याने केदार शिंदेना केला मेसेज, म्हणाला “माझी बस चुकली, पण…”
दरम्यान, रितेश-जिनिलीया ही बॉलीवूडची लोकप्रिय जोडी आहे. दोघांनीही चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. रितेशने अलीकडेच त्याच्या बहुचर्चित ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाची घोषणा केली होती. तर दुसरीकडे, जिनिलीयाचा ‘ट्रायल पीरियड’ हा चित्रपट २१ जुलैला जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला आहे.