Genelia Deshmukh : जिनिलीया आणि रितेश देशमुख यांच्याकडे मनोरंजन विश्वातलं आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठा प्रमाणात आहे. या जोडप्याला महाराष्ट्रातील त्यांचे तमाम चाहते दादा-वहिनी म्हणून हाक मारतात. रितेश-जिनिलीयाच्या लग्नाचे, त्यापूर्वी दोघेही एकमेकांना डेट करत होते तेव्हाचे बरेच किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकत्याच श्रेया गोधावतच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत जिनिलीयाने रितेशबद्दलचा एक भन्नाट किस्सा सांगितला. अभिनेत्रीला यावेळी रितेशने आजवर केलेला सर्वात मोठा प्रँक जो तू कधीच विसरू शकणार नाहीस याबद्दल विचारण्यात आलं. यावर जिनिलीया काय म्हणाली पाहूयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री ( Genelia Deshmukh ) म्हणाली, “जेव्हा आम्ही दोघं एकमेकांना डेट करत होतो त्यावेळी रितेशने मला ब्रेकअपचा मेसेज केला होता. त्याने मला रात्री आपल्यातलं नातं आता संपलंय असा मेसेज केला आणि तो झोपला. त्यावेळी तो रात्री खूप उशिरा झोपायचा आणि मी लवकर झोपायचे. त्याने मला जवळपास मध्यरात्री १ च्या दरम्यान मेसेज केला आणि तो दिवस होता ‘एप्रिल फूल’… त्याला फक्त माझ्याबरोबर प्रँक करायचा होता. मग मी पहाटे अडीजच्या सुमारास उठले तेव्हा तो मेसेज वाचला आणि मला एवढं दडपण आलं मी डिप्रेशनमध्ये होते. नेमकं काय झालं, माझं काय चुकलं असे अनेक विचार माझ्या मनात येऊ लागले.”

हेही वाचा : Mid-Week एलिमिनेशन; ‘या’ दोन सदस्यांवर टांगती तलवार, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, कोण घेणार घराचा निरोप?

जिनिलीया व रितेश देशमुख ( Genelia Deshmukh )

रितेश देशमुखने घेतलेली जिनिलीयाची फिरकी

जिनिलीया ( Genelia Deshmukh ) पुढे म्हणाली, “मला सकाळी ९ वाजेपर्यंत प्रचंड त्रास झाला. मग तो थोड्यावेळाने उठला आणि मध्यरात्री आपण काय मेसेज करून झोपलो हे त्याला आठवलं नव्हतं…त्यामुळे नेहमीप्रमाणे त्याने मला, ‘हॅलो काय करतेस?’ असा मेसेज करून प्रश्न विचारला. त्याचा मेसेज पाहून मी त्याला थेट म्हटलं, ‘मला वाटत नाही आता इथून पुढे आपण बोललं पाहिजे… मला तुझ्याशी अजिबात नाही बोलायचंय.’ यावर रितेशचा रिप्लाय आला, ‘काय झालंय नक्की?’ मी त्याला म्हणाले, ‘काही घडलंच नाहीये असा वागतोय तू’ मग, मी रितेशला त्या रात्रीच्या मेसेजची आठवण करून दिली.”

हेही वाचा : “तांबडी चामडी चमकते उन्हात …”, Bigg Boss च्या घरात येणार डीजे क्रेटेक्स; होणार मिडवीक एव्हिक्शन, पाहा व्हिडीओ

“जेव्हा मी मध्यरात्री केलेल्या मेसेजबद्दल त्याला सांगितलं तेव्हा त्याला सगळं आठवलं आणि त्याने ‘एप्रिल फूल’चा दिवस होता म्हणून असं सर्व केलं आणि नेमकं काय घडलं याचं स्पष्टीकरण जिलं. मग मी त्याला बोलले होते अशा गोष्टींमध्ये कोण प्रँक करतं का? यापुढे असं करू नकोस.” हा प्रँक कायम लक्षात राहणार असं जिनिलीयाने यावेळी सांगितलं. तसेच रितेशसारखा जोडीदार मिळाला हे माझं भाग्य असल्याचं देखील अभिनेत्रीने ( Genelia Deshmukh ) यावेळी मान्य केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Genelia deshmukh reveals riteish broke up with her without telling its a pranks sva 00