महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून रितेश आणि जिनिलीया देशमुखला ओळखलं जातं. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. पुढे जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने २०१२ मध्ये लग्न केलं. आता या जोडप्याला रियान आणि राहिल अशी दोन मुलं आहेत. या दोघांच्या संस्कारांचं अनेकदा सोशल मीडियावर कौतुक करण्यात येतं. अभिनेत्री जिनिलीया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याने ती चाहत्यांबरोबर सतत विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. सध्या अभिनेत्रीने शेअर केलेल्या अशाच एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
जिनिलीयाने देशमुखने इन्स्टाग्रामवर सर्वप्रथम रितेश तिच्या हाताला बँडेजपट्टी बांधत असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. “रितेश नक्की काय करतोय?” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं होतं. त्यानंतर अभिनेत्रीने आणखी व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये रितेशच्या साथीने त्यांची मुलं अर्था रियान आणि राहिल जिनिलीयाच्या हातावर पट्ट्या बांधत असल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्रीचे हे दोन्ही व्हिडीओ पाहून जिनिलीयाला नेमकं काय झालंय? याबद्दल तिच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.
हेही वाचा : “रिक्षा उलटी चालवली पण…”, सिद्धार्थ जाधवने दिला ७ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा, म्हणाला…
अखेर जिनिलीयाने रितेश आणि मुलांबरोबर फोटो शेअर करत देशमुखांच्या घरात नेमकं काय घडतंय यासंदर्भात एक फोटो शेअर करत माहिती दिली. जिनिलीयाने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये रितेशसह त्यांच्या मुलांच्या हाता-तोंडावर पांढऱ्या पट्ट्या गुंडाळल्याचं पाहायला मिळत आहे. आता अंगावर अशाप्रकारे पट्ट्या बांधून देशमुख कुटुंबीय नेमकं काय करणार असा प्रश्न अनेकांना पडेल म्हणून याबद्दलचा खुलासा अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये केला आहे. हाता-तोंडाला पट्ट्या बांधून जिनिलीयाने या फोटोला ‘हॅलोवीन टाइम’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच कॅप्शनच्या पुढे रियान-राहिलच्या शाळेला अभिनेत्रीने टॅग केलं आहे.
हेही वाचा : लवकरच आई होणाऱ्या सई लोकूरला अभिनेत्री क्रांती रेडकरने दिला सल्ला; म्हणाली…
![genelia deshmukh shared halloween time photo](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/10/genelia-1.jpg?w=830)
ऑक्टोबर महिन्यात दरवर्षी पाश्चात्य देशांमध्ये हॅलोवीन साजरा केला जातो. यादरम्यान भूत-प्रेतांची वेशभूषा करण्याची प्रथा पाश्चात्य देशांमध्ये आहे. त्यामुळे हॅलोवीन सणाला शोभेल अशी हटके वेशभूषा देशमुख कुटुंबीयांनी केलेली आहे. दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर रितेश लवकरच हाऊसफुल्लच्या पाचव्या भागात झळकणार आहे. याशिवाय जिनिलीयाने शेवटचं ‘ट्रायल पीरियड’ चित्रपटात काम केलं होतं.