जिनिलीया आणि रितेश देशमुख या दोघांकडे बॉलीवूडमधील आदर्श जोडी म्हणून पाहिले जाते. २०१२ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर विविध व्हिडिओ शेअर करून ते आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करीत असतात. या जोडप्याला रियान आणि राहिल अशी दोन मुलं असून, यापैकी राहिलच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाने इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट करीत आपल्या लाडक्या लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘जरा हटके जरा बचके’साठी सारा अली खानची निवड का केली? दिग्दर्शक म्हणाले, “एक देसी अंदाज…”

जिनिलीया लिहिते, “माझ्या प्रिय बाळा… जशी वर्ष संपत आहेत तसा तू माझ्यापासून आणखी दुरावणार आहेस कारण, आता चालताना तुला माझा हात धरण्याची गरज नाही…आता तुझ्यामध्ये स्वत:च्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. पाणी ग्लासमध्ये ओतून देण्यासाठी यापुढे तुला मदतीची गरज लागणार नाही, कारण तू अगदी व्यवस्थित तुझी कामे करतोस. पूर्वीप्रमाणे आता सतत तुला आई-बाबांची गरज भासणार नाही कारण, तुझे मित्र, प्रशिक्षक आणि शिक्षक तुला पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करीत आहेत.”

हेही वाचा : हृतिक रोशनला बालपणीच भेटला होता विकी कौशल; IIFA सोहळ्यातील व्हायरल व्हिडीओनंतर अभिनेत्याने शेअर केला ‘तो’ जुना फोटो

जिनिलीया पुढे लिहिते, “तुला मोठं होताना पाहून मी आणि तुझे बाबा आम्ही दोघे एका कोपऱ्यात उभे राहून कायम तुझे कौतुक करू…मी खरंच तुझ्या लहानपणीची प्रत्येक गोष्ट मिस करेन. मी आणि तुझ्या बाबांनी स्वत:ला एक वचन दिले होते की, तू जीवनात जो मार्ग निवडशील त्याचा आम्ही एक भाग होऊ. इथून पुढे तुला तुझे आयुष्य तुला जगायचे आहे…तू हसताना, रडताना, तुझ्या मदतीसाठी आम्ही तुझ्याबरोबर कायम आहोत. मी हे सर्व काही लक्षात ठेवेन पण, तू मला एकच वचन दे…बाळा तू मला रोज अशीच मिठी मारशील, तुझ्याकडून ही एकच गोष्ट मला कायम हवी आहे.”

हेही वाचा : मलायकाच्या गर्भधारणेच्या अफवांवर अर्जुन कपूरचे सडेतोड उत्तर; म्हणाला, “वस्तुस्थिती तपासल्याशिवाय काहीही गोष्टी…,”

“मेस्सी आणि फुटबॉलवर तुझे जेवढे प्रेम आहे, त्यापेक्षा खूप जास्त माझा तुझ्यावर जीव आहे. प्रिय राहिल, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.” आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जिनिलीयाने ही भावुक पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्रीने केलेली पोस्ट पाहून रितेश-जिनिलीयाच्या चाहत्यांनी सुद्धा राहिलला पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Genelia deshmukh shared instagram post for birthday wish to her baby boy rahyl sva 00