बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनेत्री जिनिलीया देशमुख प्रचंड लोकप्रिय आहे. २०१२ मध्ये अभिनेता रितेश देशमुखसह लग्न करून जिनिलीया देशमुखांची सून झाली. जिनिलीया आणि तिचे सासरे विलासराव देशमुख या दोघांचे नाते पहिल्यापासूनच खूप खास होते. त्यांनी सुनेवर मुलीसारखी माया केली. आज त्यांच्या स्मरणार्थ जिनिलीयाने इन्स्टाग्रामवर त्यांच्यासह जुना फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा : “दुबईहून येताना मला समीर वानखेडेंनी विमानतळावर अडवलं अन्…”, क्रांती रेडकरने सांगितला २०१० मध्ये घडलेला किस्सा

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Girl stops talking to family at boyfriend behest Nagpur news
प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराच्या सांगण्यावरुन मुलीचा कुटुंबियांशी अबोला
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
Milind Gawali
“तुम्ही कायम माझे हिरो”, वडिलांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाले, “पोलीस खात्यातून Retire…”
grandparent educational group formed by Prashant Bhoyer training grandparents and grandchildren together in school
आजी आजोबांसोबत शिक्षण: युवा शिक्षकाचा अफलातून प्रयोग

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणीत अभिनेत्री जिनिलीया देशमुखने भावुक पोस्ट लिहित सासऱ्यांसह जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो रितेश आणि जिनिलीयाच्या लग्नातील आहे. या फोटोवर अभिनेत्रीने “मिस यू पप्पा…”असे लिहिले आहे.

हेही वाचा : “नितीन देसाईंची घटना, राजकारण्यानी बुडवलेले पैसे अन्…”, प्रसिद्ध मराठी सेलिब्रेटी फोटोग्राफरच्या जिवाला धोका, म्हणाला “त्याच्याबद्दल काही पुरावे…”

“प्रिय पप्पा…मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे, तुमचे विचार फार प्रभावी आहेत त्यामुळे आज तुमच्याशिवाय जगणे आम्हाला कठीण जात आहे. मला खात्री आहे तुम्ही जिथे कुठे असाल ती जागा खूपच खास असेल कारण, प्रत्येकजण कायम हसत राहील याची तुम्ही फार काळजी घेता. पप्पा, तुमची खूप आठवण येते…” असे जिनिलीयाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट करून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना अभिवादन केले आहे.

हेही वाचा : Video: ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याचा अनुभव, पडद्यामागचे किस्से अन् बरंच काही…; ‘सुभेदार’च्या टीमशी दिलखुलास गप्पा

दरम्यान, जिनिलीया आणि रितेश नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. जिनिलीयाप्रमाणे अभिनेता रितेश देशमुखनेही वडिलांच्या आठवणीत एक खास व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

Story img Loader