जिनिलीया आणि रितेश देशमुख यांच्याकडे बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटामुळे त्यांच्या लव्हस्टोरीला सुरूवात झाली. एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने २०१२ मध्ये थाटामाटात लग्न केलं. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि महत्त्वाच्या गोष्टी ते आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करतात. म्हणूनच रितेश-जिनिलीयाला आज महाराष्ट्राचे दादा-वहिनी अशी एक वेगळी ओळख मिळाली आहे. या जोडप्याला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जिनिलीयाने २५ नोव्हेंबर २०१४ रोजी रियानला जन्म दिला. आज रियान त्याचा नववा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने अभिनेत्रीने आपल्या लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जिनिलीयाने रियानसाठी सोशल मीडियावर खास पत्र लिहिलं आहे.

हेही वाचा : “हे अजिबात योग्य नाही”, मराठी निर्मात्यांवर पुष्कर जोग का संतापला? सई ताम्हणकरच्या चित्रपटाचा उल्लेख करत म्हणाला…

“माझ्या लेकामुळे मला एक नवीन आयुष्य मिळालं. माझा लेक…ज्याच्यामुळे माझी प्रत्येक सकाळ आणि रात्र समाधानाची आणि आनंददायी ठरते. त्याच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे…मी काहीच करू शकत नाही. मला मातृत्व देणाऱ्या माझ्या गोड मुलाला…माझ्या प्रिय रियानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तू माझं प्रेम, माझं बाळ, माझा मित्र आणि आयुष्यभर माझा लाडका लेक असशील” अशी पोस्ट जिनिलीया देशमुखने शेअर केली आहे.

हेही वाचा : “ते मोकळ्या स्वभावाचे नाहीत”, शिवाजी साटम यांच्याबद्दल सूनेचं वक्तव्य; म्हणाली, “माझ्या सासऱ्यांचं घरात…”

दरम्यान, जिनिलीयाने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाच वर्षाव केला आहे. जिया शंकर, जेनिफर विगेंट, संजय कपूर, आशिष चौधरी या कलाकारांनी रियानला अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत रियानला शुभेच्छा दिल्या आहेत.