मराठीसह बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारा अभिनेता रितेश देशमुख आज त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याची पत्नी जिनिलीयाने खास रोमँटिक पोस्ट शेअर करून लाडक्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुखने ‘तुझे मेरी कसम’ या बॉलीवूड चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटाच्या निमित्तानेच रितेश-जिनिलीयाची पहिली भेट झाली होती. चित्रपटाच्या सेटवर झालेल्या मैत्रीचं पुढे प्रेमात रुपांतर झालं. एकमेकांना जवळपास ८ वर्ष डेट केल्यावर या दोघांनी २ फेब्रुवारी २०१२ मध्ये लग्न केलं. आता या जोडप्याला रियान व राहील अशी दोन मुलं आहेत.

Saba Azad
हृतिक रोशनची गर्लफ्रेंड असल्याने काम करण्याची गरज नाही, असे म्हणणाऱ्या नेटकऱ्याला सबा आझादचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “अंकलजी, लोक प्रेमात…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Bollywood actress Kareena Kapoor shared a cryptic post
“लग्न, घटस्फोट, चिंता अन्…”, करीना कपूरने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली…
Shreya Ghoshal Wedding Anniversary
श्रेया घोषालच्या लग्नातील फोटो पाहिलेत का? गायिकेने लग्नाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने केली खास पोस्ट शेअर, म्हणाली…
happy ratha saptami wishes
Ratha Saptami Wishes : आज रथ सप्तमीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा खास शुभेच्छा; पाहा यादी
Genelia and Riteish Deshmukh 13th Marriage Anniversary
लग्नाला १३ वर्षे पूर्ण होताच जिनिलीया देशमुखने दिली ‘या’ गोष्टीची कबुली! रितेशसह फोटो शेअर करत म्हणाली, “तू एकमेव…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Kushal Badrike Post For Shreya Bugde
“तुला भेटल्यावर…”, श्रेया बुगडेच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणाला, “स्वर्गसुद्धा नरक वाटेल…”

हेही वाचा : Video : “लग्नाची २५ वर्षे साधी गोष्ट नाही”, रवी जाधव यांनी बायकोला दिलं खास सरप्राईज, ‘अशी’ आहे दोघांची प्रेमकहाणी

आज लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाने खास पोस्ट शेअर करून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ती लिहिते, “जर रितेश देशमुख कोण आहे? असा प्रश्न मला कोणी विचारला, तर मी एवढंच म्हणेन, तो संपूर्ण जगातला खूपच चांगला मनुष्य आहे आणि तो फक्त माझा आहे. Happy Birthday नवरा!” जिनिलीयाने शेअर केलेल्या पोस्टवर रितेश कमेंट करत म्हणतो, “आय लव्ह यू बायको…तू माझ्यासाठी काय आहेस याची कदाचित तुला कल्पनाही नसेल. तू माझं आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर बनवलंस.”

हेही वाचा : “ताडपत्रीचं घर, गळणारं छत अन्…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेला आठवले संघर्षाचे दिवस; म्हणाला, “माझ्या आईने…”

रितेश-जिनिलीयाची जोडी मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांनाही महाराष्ट्राचे दादा-वहिनी म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टला अवघ्या एका तासांत दीड लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहे. चाहत्यांसह कलाकार मंडळीनी तिच्या पोस्टवर रितेशच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच रितेश बहुचर्चित ‘हाऊसफुल’ सीरिजच्या पाचव्या भागात झळकणार आहे.

Story img Loader