Genelia Deshmukh : रितेश व जिनिलीया देशमुख यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी फेब्रुवारी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्याला रियान व राहील अशी दोन मुलं आहेत. जिनिलीया मूळची महाराष्ट्रातली नसली तरीही रितेशशी लग्न झाल्यावर तिने मराठी परंपरा, सण या सगळ्या गोष्टी मोठ्या आवडीने आत्मसात केल्या.

रितेशच्या कुटुंबीयांशी जिनिलीयाचं फार सुंदर नातं आहे. अभिनेत्याचे वडील विलासराव देशमुख जिनिलीयाला आपल्या मुलीप्रमाणे मानायचे. तसेच रितेशच्या आईबरोबर सुद्धा तिचं सुंदर असं बॉण्डिंग आहे. देशमुख कुटुंबीयांमध्ये कोणाचाही वाढदिवस असो किंवा खास कार्यक्रम…जिनिलीया ( Genelia Deshmukh ) सर्वांना आवर्जुन शुभेच्छा देत असते. आज ( १० ऑक्टोबर ) लाडक्या सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाने खास पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”

हेही वाचा : २०१२ मध्ये पहिली भेट अन् रतन टाटांचे ‘ते’ शब्द कायमचे मनावर कोरले गेले…; रितेश देशमुखची भावुक पोस्ट, सांगितला जुना किस्सा

सासूबाईंसाठी जिनिलीयाची खास पोस्ट

रितेश सध्या ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात आहेत. त्यामुळे अभिनेत्याचे दोन भाऊ अमित व धीरज देशमुख यांनी वैशाली देशमुख यांचं औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याचा सुंदर व्हिडीओ रितेशने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तर, जिनिलीयाने लाडक्या सासूबाईंबरोबर खास फोटो शेअर करून याला “आईविना मला करमत नाही…” हे गाणं लावलं आहे. यावरून दोघींमध्ये किती सुंदर नातं आहे याचा अंदाज आपल्याला येतो.

जिनिलीया ( Genelia Deshmukh ) लिहिते, “प्रिय आई… माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला नेहमी योग्य व सन्मानाने पुढे जाण्याचा मार्ग दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार…आम्ही कायम तुमचं अनुकरण करू” अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : Bigg Boss संपल्यावर रितेश देशमुख पुन्हा परदेशात! दोन्ही भावांनी साजरा केला आईचा वाढदिवस, ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

हेही वाचा : Video: ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी जिंकला नसला तरी रितेश देशमुखने अभिजीत सावंतला दिली खास ट्रॉफी, गायक म्हणाला, “भाऊंनी…”

दरम्यान, जिनिलीयाच्या ( Genelia Deshmukh ) कामाबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती आमिर खानच्या ‘सितारें जमीन पर’ चित्रपटात झळकणार आहे. तिने २०२२ मध्ये ‘वेड’ हा तिचा पहिला मराठी सिनेमा केला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता येत्या काळात रितेश-जिनिलीया पुन्हा एकत्र काम केव्हा करणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.

Story img Loader