Genelia Deshmukh : जिनिलीया व रितेश देशमुख यांच्याकडे बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. दोघांचाही चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. देशमुखांच्या घरी सगळे मराठमोळे सण उत्साहात साजरे केले जाते. जिनिलीया मूळची महाराष्ट्रातली नसली तरीही लग्नानंतर तिने मराठी संस्कृती, परंपरा आवडीने जपल्या. वटपौर्णिमा, होळी, गौरी-गणपती, नवरात्रोत्सव असे सगळे सण देशमुखांच्या घरी आनंदाने साजरे केले जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाही देशमुखांच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झाल्यावर जिनिलीयाने ( Genelia Deshmukh ) खास व्हिडीओ शेअर केला होता. याशिवाय रितेशने घरातल्या सगळ्या मुलांकडून परंपरेनुसार मातीच्या मुर्त्या घडवून घेतल्या होत्या. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रितेश-जिनिलीयाने दोन्ही मुलांवर केलेल्या संस्कारांचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात आलं होतं.

हेही वाचा : Video : लेकीला पाहून आर्याच्या आईला अश्रू अनावर…; ‘बिग बॉस’ने घराबाहेर काढलं, पण अमरावतीत जल्लोषात स्वागत

देशमुखांच्या घरचा विसर्जन सोहळा

आज अनंत चतुदर्शी म्हणजेच लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. गेले दहा दिवस संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र, बाप्पाला शेवटच्या दिवशी निरोप देताना सर्वांचेच डोळे भरून येतात. देशमुखांच्या घरी यंदा सुनांनी घरच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मनोभावे पूजा करून जिनिलीया ( Genelia Deshmukh ) आणि तिच्या मोठ्या जाऊबाई अदिती यांनी बाप्पाला निरोप दिला.

जिनिलीयाने या व्हिडीओला सुंदर असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्री लिहिते, “दरवर्षी विसर्जनाच्या दिवशी मूर्ती उचलताना आम्हाला प्रचंड दडपण यायचं…त्यामुळे आम्ही तो प्रयत्न कधीच केला नव्हता. पण, यावर्षी अदिती वहिनी आणि मला बाप्पाचा आवाज ऐकू आला ‘तुम्ही करू शकता’ आणि बाप्पामुळे हे शक्य झालं. गणपती बाप्पा मोरया! दीपशिखा मिस यू”

हेही वाचा : “लोकांना वाटतं शासकीय कोट्यातून…”, नव्या घराबद्दल स्पष्टच बोलला प्रसाद ओक; ट्रोलर्सला सुनावत म्हणाला, “२८ वर्षे राबून घर घेतलं”

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : ‘बिग बॉस’च्या घरात जिनिलीयाने पाठवले उकडीचे मोदक! सगळे झाले खूश पण, सूरजच्या ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक

अदिती देशमुख यांची इन्स्टाग्राम स्टोरी

अभिनेत्रीच्या जाऊबाई अदिती देशमुख यांनी देखील विसर्जन सोहळ्याचे खास क्षण त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. दरम्यान, जिनिलीयाच्या ( Genelia Deshmukh ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच ती आमिर खानच्या ‘सितारें जमीन पर’ या चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Genelia deshmukh shares video of ganpati visarjan celebration and write special caption sva 00