Genelia Deshmukh : अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर जिनिलीया आणि रितेश देशमुख यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीने २०१४ मध्ये तिच्या पहिल्या बाळाला म्हणजेच रियानला जन्म दिला. आज रितेशचा लाडका लेक त्याचा १० वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जिनिलीयाने एक सुंदर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जिनिलीयाने लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. हा केवळ रियानचा दहावा वाढदिवस नसून मलाही आई होऊन आता १० वर्षे पूर्ण झाली असल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता आणि शिवानी सोनार लवकरच अडकणार लग्नबंधनात, बॅचलर पार्टीचे फोटो आले समोर

जिनिलीया ( Genelia Deshmukh ) लिहिते, “माय बेबी बॉय… कालचा दिवस आपण ‘सिंगल डिजिट’ म्हणून साजरा केला. कारण, आज तू १० वर्षांचा झाला आहेस. माझ्या बाळाचं मन खूप मोठं आहे आणि त्याची इच्छाशक्ती खूप जास्त दृढ आहे. गेल्या एक दशकातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे मला सुद्धा आई होऊन दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या सगळ्या काळात तुझ्यामुळे मला नव्याने अनेक गोष्टी शिकता आल्या. ते म्हणतात ना, आयुष्यातलं वादळ कधी संपतंय याची वाट पाहण्यापेक्षा आपण परिस्थितीवर मात केली पाहिजे. तुझ्यात हे सगळे गुण आहेत. गेल्या १० वर्षांत तू खूप गोष्टी शिकलास आणि मलाही नव्याने जगायला शिकवलंस. आय लव्ह यू रीयान…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेबी बॉय. मी आयुष्याभर तुझी सर्वात मोठी चिअरलीडर असेन. कायम तुझ्यावर प्रेम करेन”

जिनिलीयाने शेअर केलेल्या पोस्टवर बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत रियानवर शुभेच्छांचा वर्षांव केला आहे. तसेच जिनिलीयाची धाकटी जाऊ दीपशिखाने सुद्धा रियानला शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : व्याहीभोजन! ‘शिवा’चा आशू खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार; होणारी पत्नी काय काम करते? जाणून घ्या…

दरम्यान, रितेश-जिनिलीयाने ( Genelia Deshmukh ) २०१४ मध्ये त्यांचा पहिला मुलगा रियानला जन्म दिला. यानंतर २०१६ मध्ये या जोडप्याने त्यांचा दुसरा मुलगा राहिलचं स्वागत केलं. या दोन्ही मुलांच्या संस्कारांचं नेहमीच कौतुक केलं जातं. विशेषत: अभिनेत्रीने लग्नानंतर काही काळ कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. मुलं झाल्यावर जिनिलीयाने पूर्णवेळ घराची जबाबदारी सांभाळली. आता तिची दोन्ही मुलं मोठी झाल्यावर अभिनेत्री पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात सक्रिय झाली आहे.

Story img Loader