जून महिन्याचा तिसरा रविवार दरवर्षी ‘फादर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आई एवढंच आपल्या वडिलांना देखील महत्त्व असतं. अनेक सेलिब्रिटींदेखील आज फादर्स डे निमित्त आपल्या वडिलांना शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. मराठी कलाविश्वात देखील मोठ्या आनंदाने हा दिवस साजरा करण्यात येत आहे.

मराठीसह बॉलीवूड कलाविश्व गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून रितेश देशमुखला ओळखलं जातं. वैयक्तिक आयुष्यात रितेशने २०१२ मध्ये अभिनेत्री जिनिलीया देशमुखशी लग्नगाठ बांधली. या जोडप्याला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. आज त्याची पत्नी जिनिलीयाने एक खास पोस्ट शेअर करत रितेशला फादर्स डे निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “बंद होणार ही कल्पनाच सहन होत नाही”, ‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम अभिजीत खांडकेकरची भावुक पोस्ट, म्हणाला, “अचानक एकेदिवशी…”

रितेशसाठी जिनिलीयाची खास पोस्ट

जिनिलीयाने या पोस्टबरोबर रितेश आणि त्यांच्या मुलांचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री लिहिते, “जेव्हा मी या फोटोंकडे पाहते तेव्हा मला असं वाटतं की, हे फोटो किती परिपूर्ण आहेत. या फोटोंमध्ये माझ्यासह इतर कोणालाही जागा नाहीये… तुम्ही तिघे एकमेकांसाठी इतके जास्त परिपूर्ण आहात. प्रेम ज्याला मर्यादा नसतात असं आपण नेहमी वाचतो पण, तुमच्याकडे पाहून ते सिद्ध होतं.”

“रियान, राहिलचे बाबा रितेश देशमुख… तुम्ही आपल्या मुलांना लाभलेलं खूप मोठं आणि सुंदर गिफ्ट आहात. त्यांच्या मदतीसाठी कायम तत्पर राहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू” अशी पोस्ट जिनिलीयाने आज फादर्स डे निमित्त रितेशसाठी शेअर केली आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच रितेश देशमुख यावर कमेंट करीत म्हणाला, “आय लव्ह यू बायको…पण, तुझ्याशिवाय आम्ही तिघंही अपूर्ण आहोत. थँक्यू तू आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहेस.”

हेही वाचा : ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये वडापाव गर्लसह झळकणार ‘ही’ लोकप्रिय इन्फ्लुएन्सर, मुनव्वर फारुकीशी होते खास संबंध

दरम्यान, रितेश-जिनिलीया सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांच्या रिल्स व्हिडीओला सोशल मीडियावर नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो. याशिवाय त्यांच्या मुलांच्या संस्कारांचं देखील नेटकरी कायम कौतुक करत असतात. आता लवकरच रितेश बहुचर्चित ‘हाऊसफुल ५’ चित्रपटात झळकणार आहे. तर, जिनिलीया आमिर खानच्या ‘सितारे जमींन पर’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी दोघांनी एकत्र ‘वेड’ चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

Story img Loader