अभिनेता रितेश देशमुख(-Riteish Deshmukh) व जिनिलीया देशमुख(Genelia Deshmukh) हे महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी आहेत. चाचाहते त्यांना दादा वहिनी असे म्हणताना दिसतात. या सेलिब्रिटी जोडप्याचा चाहतावर्ग मोठा आहे. चित्रपटांबरोबरच त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओंना प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसते. ते अनेकदा विनोदी रीलमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. आता हे जोडपे एका रीलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या रीलवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावर लग्न म्हणजे काय? असे लिहिलेले दिसत आहे. जिनिलीया रितेशला म्हणते, “अहो लग्न म्हणजे काय हो?”, त्यावर रितेश म्हणतो, “अगं लग्न म्हणजे घोड्यावर बसून केलेला गाढवपणा”, या वाक्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव लक्ष वेधून घेत आहेत. तो घाबरल्याचे दिसत आहे, तर जिनिलीया त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत असल्याचे दिसत आहे. शेवटी ‘काय मी बोलून गेलो’ हे गाणे ऐकायला मिळत आहे. रितेश-जिनिलीयाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे.
नेटकरी काय म्हणाले?
रितेश-जिनिलीयाच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने, “आता काही खरं नाही”, असे म्हणत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. दुसऱ्या एका नेटकऱ्याने कमेंट करीत लिहिले, “आजचा दिवस जाऊद्या वाहिनी”, आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “आता सुट्टी नाही”, असे म्हणत हसणाऱ्या इमोजी शेअर केल्या आहेत.
अनेक नेटकऱ्यांनी आणखी काही मजेशीर कमेंट केल्या आहेत. “भाऊ आज उपाशी झोपणार”, “दादाचं काही खरं नाही हो आता”, “रितेश भाऊ जेवायला मिळतंय ना”, “दादा आता जेवण विसरा”, “आज जेवण मिळणार नाही”, “खतम टाटा बाय बाय”, अशा भन्नाट कमेंट्स पाहायला मिळत आहेत
चाहत्यांसह काही कलाकारांनीदेखील यावर कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री भाग्यश्रीने रितेश-जिनिलीयाच्या व्हिडीओवर कमेंट करीत, “तुम्ही दोघे खूप क्यूट आहात”, असे म्हटले आहे. अभिनेत्रीने त्यांचे कौतुक केले आहे, तर सुयश टिळकने हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. याबरोबरच प्रसिद्ध यूट्यूबर अर्थव सुदामेनेदेखील हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.
दरम्यान, आता रितेश देशमुख व जिनिलीया कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd