जिनिलीया व रितेश देशमुख यांच्या सुखी संसाराला आज १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांनी एकमेकांना जवळपास १० वर्षे डेट केल्यावर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्नगाठ बांधली. रितेश-जिनिलीया मराठीसह बॉलीवूडमध्येही चांगलेच लोकप्रिय आहेत. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडीओ शेअर करून जिनिलीयाने नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

जिनिलीया-रितेश यांची पहिली भेट ‘तुझे मेरी कसम’च्या सेटवर झाली होती. अनेक वर्षे डेट केल्यावर या जोडप्याने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याला रियान व राहील अशी दोन मुलं आहेत. देशमुख कुटुंबीयांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. जिनिलीयाने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त असाच मजेशीर एक मजेशीर व्हिडीओ शेअर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
kartiki gaikwad brother kaustubh announce engagement
कार्तिकी गायकवाडच्या भावाचं लग्न ठरलं! होणार्‍या पत्नीसह शेअर केला पहिला फोटो, कौस्तुभने गायली आहेत ‘ही’ लोकप्रिय गाणी

हेही वाचा : “मी जिवंत आहे”, नाट्यमय घडामोडींनंतर अखेर जगासमोर अवतरली पूनम पांडे; म्हणाली, “कर्करोगामुळे माझा मृत्यू…”

जिनिलीया या व्हिडीओमध्ये चेष्टेत रितेशच्या पोटात बुक्का मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ती लिहिते, “प्रिय नवरोबा! सदैव एकत्र राहणं, एकत्र काहीतरी खास करणं, कधीच हार न मानता प्रत्येक गोष्टीचा एकत्र सामना करणं यालाच प्रेम म्हणतात. लव्ह यू रितेश…लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”

हेही वाचा : “हे सगळं संशयास्पद”, सोलापूरच्या यात्रेतील ‘तो’ व्हिडीओ पाहून सुकन्या मोनेंचा संताप; म्हणाल्या, “कुठलेच मायबाप…”

दरम्यान, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, रेश्मा शिंदे, अक्षय टांकसाळे या कलाकारांसह नेटकऱ्यांनी रितेश-जिनिलीयावर लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Story img Loader