Genelia and Riteish Deshmukh 13th Marriage Anniversary : मराठी असो किंवा बॉलीवूड इंडस्ट्री, अगदी सोशल मीडियावरील नेटकरी सुद्धा रितेश-जिनिलीयाकडे ‘कपल गोल्स’ म्हणून पाहतात. जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी ३ फेब्रुवारी २०१२ रोजी थाटामाटात लग्न केलं. आज रितेश-जिनिलीयाच्या लग्नाचा १३ वा वाढदिवस आहे. दोघांनी मुलांना दिलेले संस्कार, त्यांची पापराझींसमोरची वागणूक यामुळेच सिनेविश्वातील ‘आदर्श जोडी’ म्हणून या जोडप्याकडे पाहिलं जातं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रितेश-जिनिलीयाला महाराष्ट्राचे दादा वहिनी म्हणून ओळखलं जातं. दोघांची पहिली भेट ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या निमित्ताने झाली होती. २००२ ते २०१२ अशी दहा वर्षे या जोडप्याने एकमेकांना डेट केलं, प्रेमपत्र लिहिली अखेर २०१२च्या फेब्रुवारी महिन्यात या जोडप्याचा विवाहसोहळा पर पडला. आज लग्नाच्या १३ व्या वाढदिवसानिमित्त जिनिलीया वहिनींनी रितेशसाठी एक महत्त्वाची कबुली दिली आहे. जिनिलीयाने कबुली ( Confession ) असं कॅप्शन देत लाडक्या नवऱ्यासाठी ही पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणालीये, जाणून घेऊयात…

जिनिलीया देशमुख पोस्ट शेअर करताना लिहिते, “महत्त्वाची कबुली ( Confession ) मी सहसा सगळ्या गोष्टी प्लॅन करून करते पण, या सगळ्यात एकच अपवाद आहे आणि तो म्हणजे रितेश… ( माझ्या आयुष्यातील एकमेव गोष्ट जी मी कधीच नियोजन करून केलेली नाही. ) आपलं प्रेम, आपली जोडी माझ्या सगळ्यात आवडती आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… माय पार्टनर इन क्राइम, माझा उत्तम जोडीदार, माय होम… आणि माझ्या हसण्याचं, स्मितहास्याचं आणि सकारात्मक उर्जेचं सर्वात मोठं कारण आहेस तू… #१३वर्षे पूर्ण झाली हा प्रवास असाच पुढे जाईल.”

जिनिलीयाच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह असंख्य नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. “महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश दादा आणि जेनेलिया वहिनी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” अशा कमेंट्स या जोडप्याच्या चाहत्यांनी अभिनेत्रीच्या पोस्टवर केल्या आहेत.

दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेता सध्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख करणार असून याची निर्मिती ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख करणार आहेत. तसेच या चित्रपटाला अजय-अतुल संगीत देणार आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.