अभिषेक बच्चन व सैयामी खेर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘घूमर’ चित्रपट १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची गेले काही दिवस खूप चर्चा होती. कलाकार चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होते. दरम्यान, शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

“मी तुला काम देणार नाही,” सलमान खानने प्रसिद्ध अभिनेत्याची उडवलेली खिल्ली; म्हणालेला, “तू जाडजूड गाय…”

Shahid Kapoor starr Deva box office collection day 2
शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाच्या कमाईत वाढ, दोन दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला 
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
Deva Advance Booking Day 1
शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू; पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
3g a killer connection kissing scenes
तब्बल ३० किसिंग सीन, बोल्ड दृश्यांचा भडीमार असलेला फ्लॉप बॉलीवूड चित्रपट, कमावलेले फक्त…
Fussclass Dabhade Box Office Collection
हेमंत ढोमेच्या ‘फसक्लास दाभाडे’ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात! ३ दिवसांत कमावले तब्बल…; म्हणाला, “तिकीटबारीवर…”
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…

बॉक्स ऑफिसवर सध्या ‘गदर २’ चा जलवा पाहायला मिळत आहे. तर ‘ओएमजी २’ चित्रपटही अजुन सिनेमागृहांमध्ये चालतोय. अशातच ‘घूमर’ प्रदर्शित झाला. ‘घूमर’ला आधीच चालणाऱ्या दोन चित्रपटांशी स्पर्धा करावी लागली. अभिषेक बच्चनच्या ‘घूमर’ या चित्रपटाला रिव्ह्यू मिळाले आहेत, पण हा चित्रपट सनी देओलच्या ‘गदर २’समोर टिकू शकला नाही. अशा परिस्थितीत चांगला कंटेंट असूनही ‘घूमर’ला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक मिळालेले नाहीत.

सलमान खानशी भांडण अन् करिअर संपलं, अभिनेत्याने आत्महत्येचे केले प्रयत्न; म्हणाला, “मी तुरुंगात असताना…”

‘घूमर’च्या पहिल्या दिवसाची सुरुवातीची आकडेवारी समोर आली आहे. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार चित्रपटाने फक्त ८५ लाखांची कमाई केली. मोठी स्टारकास्ट असलेला ‘घूमर’ आर बाल्की यांनी दिग्दर्शित केला आहे. क्रिकेटवर आधारित या चित्रपटाची चांगली चर्चाही होती, मात्र पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे पाहता चित्रपटाने फारच निराशाजनक कामगिरी केली आहे.

दरम्यान, ‘घूमर’ एका दिव्यांग महिला खेळाडूच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर बेतलेला चित्रपट आहे. या महिला क्रिकेटपटूची भूमिका अभिनेत्री सैयामी खेरने केली आहे. यामध्ये अभिषेक आणि सैयामीसह अंगद बेदी, शबाना आझमी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader