बॉलीवूडच्या किंग खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जवान’ आज प्रदर्शित झाला आहे. अ‍ॅटली दिग्दर्शित या चित्रपट शाहरुख व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपति, प्रियामणि, सान्या मल्होत्रा, रिद्धि डोगरा, लहर खान, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य हे सर्व महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. यामध्ये एक खास गोष्ट म्हणजे मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे सध्या तिची चांगलीच चर्चा सुरू आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिनं ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा अनुभव सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – रश्मिका मंदाना विजय देवरकोंडाबरोबर राहतेय लिव्ह-इनमध्ये? ‘या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

‘जवान’ चित्रपटाच्या निमित्तानं गिरीजा ओकने ‘राजश्री मराठी’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलला मुलाखती दिली. यावेळी तिला विचारलं गेलं की, तुझा ”जवान’ चित्रपटाच्या सेटवरचा शूटिंगचा पहिला दिवस कसा होता? किती उत्सुकता होती?’ तेव्हा गिरीजा म्हणाली की, “माझ्या शूटिंगचा पहिला दिवस योगायोगाने पुण्यात होता. आता मी पुण्यात राहत नसले तरी अनेक वर्ष मी पुण्यात राहिली आहे. पुण्यात आमच्या शूटचा पहिला दिवस मेट्रो स्ट्रेशनवरती होता. त्यामुळे स्टेशनवर एक-एक किलोमीटर लांबपासून बॅरीगेटींग होतं. मोजक्याच गाड्या आत येऊ देत होते आणि मोठा तामझाम होता. खूप ज्युनिअर, खूप मोठा क्राउड होता. पहिल्याच दिवशी आपण कोणत्या दर्जाच्या चित्रपटात काम करणार आहोत, याचा अनुभव आला. अगदी बाहेरपर्यंत सिक्युरिटी होती. कोणीच कोणाला आतमध्ये येऊ देत नव्हतं. खूप तामझाम असं सगळं होतं. त्यामुळे खूपच मज्जा वाटत होती.”

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी लग्नाच्या चर्चांवर स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी ४ फेब्रुवारीला…”

हेही वाचा – समुद्रात गाण्याचं शूटिंग करताना ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर घडली भयंकर घटना; व्हिडीओ आला समोर

पुढे गिरीजा म्हणाली की, “जेव्हा आम्ही शूट करण्यासाठी मुंबईला परत आलो होतो तेव्हा खऱ्या अर्थाने पहिला दिवस मी शाहरुख खानला भेटले. आम्ही पहिल्यांदा सेटवर गेल्यावर आम्हा सहा जणींना त्याने मिठी मारली आणि म्हणाला, ‘धन्यवाद. तुम्ही या चित्रपटाचा एक भाग आहात.’ तो क्षण मी विसरू शकत नाही. कारण मला हे अपेक्षित नव्हतं की, तो सेटवर आल्या आल्या आमचं असं स्वागत करेल. जसं नेहमी काम सुरू होतं, सहकलाकारांना हॅलो, हाय बोलून तसं वाटलं होतं. पण तो प्रत्येक जणींकडे येऊन मिठी मारून आभार मानत होता. हा क्षण खूप खास होता. आम्ही या चित्रपटासाठी खूप शूटिंग केलं. जवळपास आम्ही ४५ दिवस चेन्नईत होतो. आम्ही सगळ्या पोरी एकत्र राहत होता. त्यामुळे आम्ही एक वेगळा दंगा केला. अशा प्रकारच्या खूप आठवणी आहेत.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girija oak godbole first day of shooting jawan movie with shahrukh khan pps
Show comments