गेले काही दिवस बॉलिवूड चित्रपटांना वाईट दिवस आले आहेत. अनेक बड्या कलाकारांचे चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आणण्यात अपयशी झाले आहेत. एकंदरीतच हिंदी चित्रपटांना फारसा चांगला प्रतिसाद मिळत नाहीये. अशातच दिग्दर्शक विकास बहल यांचा ‘गुडबाय’ हा कौटुंबिक चित्रपट काल चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आता रश्मिका मंदाना, अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता स्टारर ‘गुडबाय’ चे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : ‘गुडबाय’ चित्रपटासाठी विकास बहल यांनी मानले क्रिती सेनॉनचे विशेष आभार, जाणून घ्या काय आहे कनेक्शन

या चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या. कारण पुष्पा गर्ल रश्मिका मंदाना ‘गुडबाय’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत होती. पण या चित्रपटाचे पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे बघितले तर खूपच निराशा झाली आहे. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुडबाय’चे कौतुक केले जात होते, परंतु कलेक्शनच्या बाबतीत हा चित्रपट काही विशेष कामगिरी करू शकला नाही.

‘गुडबाय’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, रश्मिका मंदानासारखी तगडी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १.२० ते १.४० कोटी रुपयांची कमाई केल्याचे बोलले जात आहे. ही रक्कम निर्मात्यांना अपेक्षित रकमेच्या खूप कमी असल्याने त्यांना धक्का बसला. पहिल्याच दिवशी रश्मिका आणि अमिताभ बच्चन यांचा ‘गुडबाय’ बॉक्स ऑफिसवर संघर्ष करताना दिसला.

प्रदर्शनाच्या आधी ‘गुडबाय’ला प्रेक्षकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे चित्रपटगृहात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी या चित्रपटाच्या टीमला अपेक्षा होती. पण पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यात फारसा रस दाखवला नाही.

आणखी वाचा : “मी आजही माझ्या एक्सबरोबर…”, रश्मिका मंदानाने तिच्या अफेअरबद्दल केला मोठा खुलासा

गेले अनेक दिवस रश्मिका या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. ती अनेक टीव्ही शोमध्ये दिसली, त्याचप्रमाणे अनेक शहरांनाही तिने भेट दिली. पण त्याचा फायदा चित्रपटाच्या कमाईवर झालेला दिसत नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goodbye film did not get good response from the audience rnv