राज कपूर यांच्यानंतर दिग्दर्शक सुभाष घई यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे दुसरे शोमॅन म्हंटलं जातं. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुभाष घई यांचं योगदान फार मोलाचं आहे. त्यांनी अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. १९९१ सालचा त्यांचा ‘सौदागर’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार, राज कुमार, अनुपम खेर, अमरिष पुरी, जॅकी श्रॉफ, अशा दिग्गज लोकांबरोबर काम केलं. या चित्रपटातून अभिनेत्री मनीषा कोइराला हिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

याच चित्रपटात आणखी एका अभिनेत्याची महत्त्वाची आणि मोठी भूमिका होती. ते अभिनेते म्हणजे गोविंद नामदेव. गोविंद नामदेव यांनी कित्येक चित्रपटात महत्त्वाच्या छोट्या भूमिका तसेच खलनायकाच्या भूमिका निभावल्या आहेत. ‘सौदागर’मध्येसुद्धा गोविंद नामदेव यांची महत्त्वाची भूमिका होती जी पडद्यावर येण्याआधीच छाटण्यात आली आणि यामुळे गोविंद आणि सुभाष घई यांच्यात दरी निर्माण झाली ती कायमची.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

याविषयीच गोविंद नामदेव यांनी भाष्य केलं आहे. सुभाष घई यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव हा अत्यंत क्लेशकारक होता असं गोविंद म्हणाले आहेत. लेहरन रेट्रोला मुलाखत देताना गोविंद म्हणाले, “जेव्हा मला ती भूमिका मिळाली तेव्हा ती बरीच मोठी होती अन् नंतर ती छाटण्यात आली. हे माझ्या ध्यानात येईपर्यंत मी सगळ्यांना सांगून मोकळा झालो होतो की मी दिलीप कुमार, राज कुमार व सुभाष घई यांच्याबरोबर काम करत आहे. चित्रीकरणदेखील पूर्ण झालं होतं.”

चित्रीकरणानंतर सगळ्यांना डबिंगसाठी बोलावण्यात आलं पण गोविंद नामदेव यांना बोलावलं नव्हतं. चित्रपटाची सुरुवात आणि शेवट हे दोन्ही गोविंद नामदेव यांच्या भूमिकेनेच होतो असा त्यांनी या मुलाखतीमध्ये खुलासा केला. सुभाष घई यांनी साडेचार तासांचा चित्रपट केला होता अन् नंतर तो एडिट करण्यासाठी त्यांनी गोविंद नामदेव यांचं पात्र कमी केलं. गोविंद म्हणाले, “त्यांना कुणीतरी माझी भूमिका कमी करायला सांगितली अन् त्यांनी तसं केलं, मला त्याचं फार वाईट वाटलं.”

आणखी वाचा : दारू ओतलेला केक कापताना रणबीर बोलला ‘जय माता दी’; धार्मिक भावना दुखावल्याने अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल

पुढे सुभाष घई यांनी कधीच गोविंद नामदेव यांच्याबरोबर काम केलं नाही. अभिनेते म्हणाले, “मी पुन्हा कधीच त्यांच्याबरोबर काम केलं नाही. त्यांनी मला कधीच पुन्हा फोन केला नाही की मी त्यांच्याकडे काम मागण्यासाठी गेलो नाही. त्यांनी माझ्याशी कसलीही चर्चा न करता माझी भूमिका कापली याचं मात्र मला आजही वाईट वाटतं.” गोविंद नामदेव यांना असेच आणखी अनुभव आल्याने त्यांनी काही असे दिग्दर्शक आहेत ज्यांच्याबरोबर कधीच काम करणार नाही असं ठरवलं आहे.