Govinda: अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने त्यांच्या लग्नाबद्दल आणि पतीच्या रोमँटिक स्वभावाविषयी काही वक्तव्ये केली आहेत. सुनीताने सांगितलं की जेव्हा ती गोविंदाला भेटली होती, तेव्हा ती टॉमबॉयसारखी राहायची. तिचे केस लहान होते आणि ती स्कर्ट घालायची. “मी नेहमी शॉर्ट्स घालायचे. जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा माझे केसदेखील लहान होते. तो म्हणायचा की मी मुलासारखी आहे. मी नेहमी साडी नेसावी अशी त्याची इच्छा होती, पण त्याबाबतीत तो मला कधीच आवडला नाही; कारण तो मागासलेल्या विचारांचा होता,” असं सुनीता हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनीताने सांगितलं की गोविंदा मुलींना स्पर्श करण्यासही घाबरायचा, त्यामुळे नात्यासाठी तिनेच पुढाकार घेतला होता. गोविंदा खऱ्या आयुष्यात अजिबात रोमँटिक नाही, असं सुनीताने नमूद केलं. “आता तो रोमँटिक झाला आहे की नाही हे मला माहीत नाही. लोक तुमच्या पाठीमागे काय करतात हे तुम्हाला कधीच कळत नाही. पुरुषांवर कधीही विश्वास ठेवू नका. ते सारखे बदलत असतात. आमच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. तो कुठे जाणार? पूर्वी तरी कुणाबरोबर गेला नाही, आताचं मी सांगू शकत नाही,” असं मजेशीरपणे सुनीता म्हणाली.

हेही वाचा – Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ

वेगळे राहतात सुनीता-गोविंदा

सुनीता व गोविंदा एकत्र राहत नाही. बहुतांशी दोघेही वेगवेगळ्या घरात राहतात. गोविंदा अनेकदा त्याच्या बंगल्यावर राहतो कारण त्याला मीटिंग आणि लोकांच्या भेटीगाठींमुळे उशीर होतो. “आमची दोन घरं आहेत, आमच्या अपार्टमेंटच्या समोर एक बंगला आहे. फ्लॅटमध्ये माझे मंदिर आणि माझी मुलं आहेत. आम्ही फ्लॅटमध्ये राहतो आणि त्याला लोकांना भेटण्यात उशीर होतो. त्याला बोलायला आवडतं, त्यामुळे तो १० लोकांना गोळा करून त्यांच्याशी गप्पा मारत बसेल. मी, माझा मुलगा आणि माझी मुलगी फ्लॅटमध्ये एकत्र राहतो, पण आम्ही फार कमी बोलतो कारण मला वाटतं की तुम्ही जास्त बोलून तुमची ऊर्जा वाया घालवता,” असं सुनीता म्हणाली.

हेही वाचा – Bigg Boss 18 फेम विवियन डिसेनाच्या पहिल्या बायकोने एका महिन्यात सोडली मालिका, ७ वर्षांनी केलेलं पुनरागमन; नेमकं काय घडलं?

पुढच्या जन्मात हा नवरा नको – सुनीता

गोविंदाच्या रोमँटिक स्वभावाबद्दल विचारल्यावर सुनीता हसली आणि म्हणाली, “मी त्याला सांगितलंय की मला पुढच्या जन्मात तो नवरा म्हणून नकोय. तो फिरायला जात नाही. मला पतीबरोबर बाहेर जाऊन रस्त्यावर पाणीपुरी खायची इच्छा आहे. पण त्याने कामात खूप वेळ घालवला. आम्ही दोघे एकत्र चित्रपट पाहायला बाहेर गेल्याचं मला आठवतच नाही.”

हेही वाचा – एक पारशी, एक मुस्लीम, एक शीख आणि एका हिंदूचे निधन…; अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट, नेटकऱ्यांच्या भावुक कमेंट्स

पतीच्या अफेअर्सबद्दल सुनीता काय म्हणाली?

जेव्हा गोविंदा रवीना टंडन आणि करिश्मा कपूर सारख्या अभिनेत्रींबरोबर काम करत होता, तेव्हा वैवाहिक आयुष्य जास्त सुरक्षित वाटायचं, असं सुनीताने सांगितलं. “मी आमच्या लग्नात पूर्वी खूप सुरक्षित होते, आता नाही,” असं ती हसत म्हणाली. गोविंदा करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना त्याच्या अफेअरच्या अनेक अफवा पसरल्या मात्र त्यामुळे काहीच फरक पडला नाही, असं सुनीताने नमूद केलं. “आधी मला काहीच फरक पडत नव्हता. पण आता त्याचे वय ६० पेक्षा जास्त झाले आहे, त्यामुळे मला भीती वाटते. जेव्हा तो तरुण होता तेव्हा तो इतका काम करायचा की त्याच्याकडे अफेअर्ससाठी वेळ नव्हता पण आता मला भीती वाटतं की रिकामा वेळ आहे तर काही करायला नको,” असं सुनीता म्हणाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govinda and wife sunita ahuja live separately sunita talks about his affairs not sure if he is cheating on her hrc