अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कॉमेडियन कृष्णा अभिषेक यांच्यादरम्यान काही वर्षांपासून वाद सुरू आहे. गोविंदा तर कृष्णाबद्दल बोलणं कटाक्षाने टाळतो. पण, कृष्णा मात्र बऱ्याचदा मामाबद्दल बोलत असतो. कृष्णा व बहीण आरती सिंह या दोघांनीही कठीण काळात आणि इंडस्ट्रीत संघर्ष करत असताना मामा गोविंदाने आर्थिक मदत केल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी दर महिन्याला त्यांच्याकडून दोन हजार रुपये मिळायचे, असं म्हटलं होतं. त्यावरून गोविंदा व त्याची पत्नी सुनिताने नाराजी व्यक्त केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Video: “हे आहेत सुशिक्षित अडाणी लोक” सुंबूल तौकीर खानचं होळी सेलिब्रेशन पाहून नेटकऱ्यांचा संताप; कारण वाचून तुमचाही राग होईल अनावर

आता पुन्हा एकदा त्यांना कृष्णा व आरतीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर सुनिता संतापल्याचं पाहायला मिळालं, तर गोविदांने कौटुंबीक मुद्द्यांवर माध्यमांसमोर चर्चा चर्चा करायला आवडत नसल्याचं म्हटलं आहे. गोविंदा आणि सुनिता आहुजा यांनी ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली. यादरम्यान आरती सिंह आणि कृष्णा अभिषेक यांच्या जुन्या मुलाखतींचा उल्लेख केला असता सुनिता संतापल्या. त्या म्हणाल्या, “कोणताही फालतू प्रश्न विचारू नका. गोविंदाला उत्तर द्यायचं असेल तर त्याने द्यावं, पण मी देणार नाही. कारण त्या दोघांनी तुमच्या मुलाखतीत जे काही सांगितलं ते खरं नाही. त्यामुळे माझी चिडचिड होत आहे. गोविंदाही त्यांना कधीच काही बोलत नाही. मला आता पश्चाताप होतोय की मी त्यांची इतकी काळजी का घेतली होती.” त्यावर गोविंदा सुनिताला शांत राहण्यास सांगतो.

Video: “यांना पेंग्विनचा त्रास आहे अन्…” खांद्यावर पोपट ठेवून होळीच्या शुभेच्छा देणाऱ्या अमृता फडणवीस ट्रोल

गोविंदा म्हणाला, “प्रत्येक माणसाचा स्वतःचा स्वभाव असतो. मला असं वाटतं की कौटुंबिक विषयांवर माध्यमांमध्ये चर्चा झाली नाही तर बरं असतं.” त्यावर सनिता मध्येच तुमच्याबद्दल लोक खोटं बोलले हे ठीक आहे का? तुम्हाला त्याची काही अडचण वाटत नाही का? असं विचारलं. “चिची मामाने आम्हाला फक्त दोन हजार रुपये दिले. त्यांची काहीही मदत झाली नाही” असं ते बोलतात. ते मीडियामध्ये बोलण्याची पर्वा करत नाहीत आणि तुम्ही इतके नाराज का होताय हे मला कळत नाही,” असं सुनिता गोविंदाला म्हणाल्या.

 विद्या बालनने न्यूड फोटोशूट आता केलंय? जाणून घ्या ‘त्या’ व्हायरल फोटोमागचं सत्य

“त्यावेळी आई सर्व ठरवायची. या सर्वांना त्यावेळी काय सांगितलं गेलंय, ते लहान असताना त्यांना काय दाखवलंय, ते माहीत नाही. बऱ्याचदा तुम्ही खूप काळजी करता, पण तो चांगुलपणा दाखवला जात नाही. तुम्ही काहीच केलं नाही, जे केलंय ते आम्ही स्वतःच केलंय, असं म्हटलं जातं. पण तसं नसतं काळजी करणाऱ्याला माहीत असतं की त्याने जे केलं होतं, ते चांगलंच होतं. सत्य कधीच लपून राहत नाही. कृष्णा व आरतीचे वडील खूप चांगले होते, त्यांची आई माझी आवडती बहीण होती. त्यामुळे लोक काहीही बोलले तरी मी ते फार मनावर घेत नाही,” असं गोविंदा त्याची बाजू मांडताना म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govinda and wife sunita talks about krushna abhishek arti singh over their old money statement hrc