गोविंदा हा १९९० च्या दशकातील सुपरस्टार होता. त्याचं नृत्यकौशल्य, विनोदाचं टायमिंग, आणि भावनिक डायलॉग्स म्हणायची त्याची खास शैली आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. ‘बीबी नंबर १’, ‘कुली नंबर १’, ‘राजा बाबू’, ‘क्यूँकी मैं झूठ नहीं बोलता’ या सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांनी गोविंदाने बॉलीवूडमध्ये आपलं अधिराज्य निर्माण केलं. तो इतका व्यस्त असायचा की दिवसाला दोन शिफ्टमध्ये तरी काम करायचा, असं गोविंदाने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

गोविंदा सुपरस्टार असताना त्याचे सेटवरील अनेक किस्से गाजले आहेत. नुकताच ‘स्त्री २’ मधील ‘जना’ या पात्राची भूमिका साकारणाऱ्या अभिषेक बॅनर्जीने गोविंदाचा एक खास किस्सा सांगितला आहे.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nayanthara News
“फक्त तीन सेकंदांच्या व्हिडीओसाठी…”, धनुषने कायदेशीर नोटीस पाठविल्याने नयनतारा भडकली; म्हणाली, “तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती…”
ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
delivery boy
“डिलिव्हरी बॉयचा संघर्ष कधीच कुणाला दिसत नाही!” VIDEO होतोय व्हायरल; नेटकरी म्हणाले ” डिलिव्हरी बॉयचा आदर करा”
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

हेही वाचा…Video : ‘या’ हिंदी चित्रपट निर्मात्याने लिहिली ‘लय भारी’ सिनेमाची कथा; आमिर खानही ऐकून झाला चकित; म्हणाला, “त्याचा चेहरा बघून…”

गोविंदा १९९० च्या दशकात उशिरा सेटवर येण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याच्या अनेक सहकलाकारांनी या सवयीबद्दल उघडपणे सांगितलं आहे. परंतु, काम करण्याचा वेग आणि सेटवर असताना त्याचं असामान्य कौशल्य, कामाप्रती समर्पण यावर फार कमी लोकांनी चर्चा केली आहे. एका अलीकडच्या मुलाखतीत अभिषेक बॅनर्जीने गोविंदाबद्दलचा असाच एक किस्सा शेअर केला, जो दिग्दर्शक डेविड धवनने त्याला सांगितला होता. अभिषेकने सांगितलं की गोविंदा इतका ‘जीनियस’ होता की तो १२ तासांचं काम फक्त दोन तासांत पूर्ण करू शकत असे.

गोविंदाने १५ मिनिटांत डान्स सीक्वेन्स पूर्ण केला

अभिषेकने ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “डेविड सरांनी (डेविड धवन) मला एकदा सांगितलं होतं की ते पॅरिसमध्ये आयफेल टॉवरजवळ गाण्याचं शूट करत होते. त्यांना तिथं एक सीन शूट करायचा होता. कदाचित ते ‘हिरो नं १’ चित्रपटाचं शूटिंग असावं. त्यांना तिथं चित्रीकरण करण्याची परवानगी मिळाली नव्हती आणि वेळ देखील कमी होता. तेव्हा गोविंदाने फक्त डेविड धवनला सांगितलं की ‘तुम्ही कॅमेरा सुरू करा.’ आणि जे काही शूट करायचं होतं, ते गाण्याचे स्टेप्ससह, गोविंदाने फक्त १५-२० मिनिटांत संपूर्ण गाणं आणि त्याच्या सगळ्या ग्रुपबरोबर शूट केलं. त्यानंतर ते तिथून निघून गेले.” करिश्मा कपूरही गोविंदाबरोबर त्या गाण्याच्या सीक्वेन्सचा भाग होती.

हेही वाचा…Bhool Bhulaiyaa 3 : मंजुलिका पुन्हा आली…! ‘भुल भुलैय्या ३’ मध्ये दिसणार कार्तिक-विद्याची अनोखी जुगलबंदी; टीझर प्रदर्शित

अभिषेक पुढे सांगतो, “आज असं करणं शक्य नाही. आज कोणाला असं काम करता येईल असं मला माहीत नाही. असं करण्याइतका प्रोफेशनलपणा कोणाकडे असेल असं मला वाटत नाही. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तुमच्याकडे कमी वेळ आहे आणि तुम्हाला ते काम वेळेत पूर्ण करायचं आहे, तेव्हा काम वेळेत पूर्ण करणं ही देखील एक प्रोफेशनॅलिझमची पद्धत आहे.”

हेही वाचा…“मी ‘तुंबाड’साठी सात वर्षं दिली”, अभिनेता सोहम शाहचे वक्तव्य; आमिर खानचा उल्लेख करत म्हणाला, “माझं वय वाढत होतं; पण…”

गोविंदाने तीन दिवसांचं ७० टक्के काम एका दिवसांत पूर्ण केलं – वाशू भगनानी

यापूर्वी, यूट्यूब चॅनेल ‘रिव्ह्यूरॉनवर’ दिलेल्या मुलाखतीत निर्माता वाशू भगनानी यांनी सांगितलं होतं की ‘हिरो नं १’ च्या शूटिंगदरम्यान गोविंदा तीन दिवस सेटवर हजर झाला नव्हता. पण जेव्हा तो आला, तेव्हा त्याने जवळपास सगळं काम एका दिवसांत पूर्ण केलं. वाशू भगनानी यांनी आठवण सांगितली की एक ७५ लोकांचं युनिट स्वित्झर्लंडमध्ये तीन दिवस थांबून बसलं होतं कारण गोविंदा देशात पोहोचला नव्हता. त्यानंतर त्यांनी गोविंदाचं कौतुक करत सांगितलं, “पहिला शॉट त्याने सकाळी ७:३० वाजता दिला. ते चित्रपटातील पहिलं गाणं होतं. त्याने त्या गाण्याचं ७० टक्के शूटिंग एका दिवसात पूर्ण केलं. तो तीन दिवस गैरहजर होता, पण त्याने ७० टक्के काम एका दिवसात पूर्ण केलं. हे खरंच प्रशंसनीय आहे.”