Tina Ahuja Bollywood Career : अभिनेता गोविंदाची मुलगी, टीना आहुजा हिने तिच्या अभिनय करिअरबद्दल सांगितलं आहे. टीनाने २०१५ मध्ये गिप्पी ग्रेवाल आणि धर्मेंद्र यांच्याबरोबर ‘सेकंड हँड हसबंड’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण हा तिचा पहिला व शेवटचा सिनेमा ठरला. त्यानंतर ती एकाही चित्रपटात दिसली नाही; मात्र तिने काही म्युझिक व्हिडीओंमध्ये काम केलं आहे. टीनाचे वडील सध्या व्यावसायिकदृष्ट्या कठीण काळातून जात आहे, मात्र ती त्यांच्याबरोबरच काम करतेय असं तिने सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत, टीनाचं नेमक काय चुकलं असं विचारण्यात आलं. त्यावर तिने उत्तर दिलं. “खरं सांगायचं झाल्यास मी खूप लवकर पुढे गेले. कारण एक वेळ अशी आली जेव्हा लोक म्हणत होते की ‘तुझ्या घरी अभिनयाचे इन्स्टिट्यूट (गोविंदा) आहे, तू बाहेर का धडपडत आहेस’. ते सगळं ऐकून माझी खूप चिडचिड होऊ लागली होती. त्या गोष्टीमुळे नंतर मला खूप वैताग येऊ लागला. मी पुन्हा पुन्हा त्याच प्रश्नाची उत्तरं का द्यावी?” असं टीना म्हणाली.

हेही वाचा – “मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

टीना वडील गोविंदाबरोबर करते काम

आता तिला तिच्या वडिलांबरोबर काम करायला आवडू लागलंय, असं ३५ वर्षीय टीनाने सांगितलं. “मी ठरवलं की मी माझ्या वडिलांबरोबर काम करेन. कदाचित नंतर मला ज्या गोष्टी आवडतात, त्याही करेन. काही गोष्टी घडणार आहेत, तर त्या घडणारच. देवाच्या कृपेने मला घर चालवायचं नाही. नंतर मला माझ्या वडिलांबरोबर काम करायला आवडू लागलं आणि मी बऱ्याच गोष्टी मागे सोडल्या आहेत, हेही मला जाणवलं नाही. मग मी ठरवलं, या गोष्टी मला करायच्या नाहीत. मला अशा गोष्टी करायला आवडतील, ज्याचा मला एक भाग व्हायचं आहे,” असं टीना म्हणाली.

गोविंदा व त्याची लेक टीना आहुजा (फोटो – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – ‘टाइम ट्रॅव्हल’वर आधारित चित्रपट पाहायला आवडतात? OTT वरील ‘हे’ सिनेमे पाहून डोकं चक्रावेल

लोकांना माझ्याबद्दल मतं तयार करायची असतील तर…

इंडस्ट्रीत तिच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत, असं टीनाला वाटतं. “मी लूक टेस्ट द्यायला तयार होते, पण लोकांना वाटलं की मी स्टारकिड आहे, मी गोविंदाची मुलगी आहे, त्यामुळे कदाचित मी लूक टेस्ट करायला तयार नसेन. पण जर लोकांना माझ्याबद्दल त्यांच्या डोक्यात मतं तयार करायची असतील तर त्याला मी काहीच करू शकत नाही. मी लूक टेस्टसाठी तयार होते, स्क्रीन टेस्टसाठी तयार होते. पण ठिके. तुम्ही कास्टिंग करणाऱ्या प्रत्येकाला त्याच त्या गोष्टी नाही सांगू शकत. त्यामुळे मी आयुष्यात पुढे जायचं ठरवलं,” असं टीना म्हणाली.

हेही वाचा – “डोळ्यावर पट्टी बांधून एका घरात नेलं अन्…”, कॉमेडियन सुनील पालने सांगितला अपहरणाचा घटनाक्रम; म्हणाला, “२० लाख रुपये…”

वडिलांबरोबर काम करून आवश्यक त्या सर्व लक्झरी गोष्टी मिळत आहेत, असं तिने सांगितलं. “मला प्लॅन बी करताना जास्त चांगल्या लक्झरी गोष्टी मिळत आहेत. जर मला माझ्या वडिलांबरोबर काम करून फर्स्ट क्लासचे तिकीट मिळत असेल तर मग मी काम मिळवण्यासाठी इकॉनॉमीतून प्रवास का करू,” असं टीना म्हणाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govinda daughter tina ahuja talks about her failed bollywood career she works with her father hrc