अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांची मुलगी टीना आहुजाने मासिक पाळीबद्दल वक्तव्य केलं आहे. तिच्या या वक्तव्याची सध्या खूप चर्चा होत आहे. टीनाने तिच्या आईबरोबर एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील विविध गोष्टींबाबत चर्चा केली. यावेळी तिने मासिक पाळीत होणाऱ्या त्रासाबद्दल तिचं मत मांडलं. मासिक पाळीच्या वेदना फक्त मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरांमधील महिलांना होतात. लहान शहरांमध्ये महिलांना पाळी कधी येते, कधी जाते हेही माहीत नसतं. तसेच पिरियड क्रॅम्प्स हे मानसिक असतात असा दावाही तिने केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

टीना आहुजा म्हणाली, “मी चंदीगडमध्ये जास्त राहते आणि मी फक्त मुंबई आणि दिल्लीतील मुलींना पिरियड क्रॅम्प्सबद्दल बोलताना ऐकलं आहे. निम्म्या अडचणी तर या त्याबद्दल बोलतात, त्यातूनच उद्भवतात. कधीकधी ज्यांना पिरियड क्रॅम्प्स होत नाही, त्यांनाही ते मानसिकदृष्ट्या जाणवू लागतात. पंजाब आणि इतर लहान शहरांतील महिलांना मासिक पाळी कधी येते किंवा रजोनिवृत्ती कधी येते हेही माहीत नसतं. त्यांना पाळी आल्याचं जाणवत नाही.”

हेही वाचा – “माझी चूक झाली”, शूटिंग करूनही पैसे न मिळाल्याने मराठी अभिनेत्रीचा संताप; स्क्रीनशॉट पोस्ट करत म्हणाली…

मासिक पाळीदरम्यान महिलांना जो त्रास होतो, त्याला महिलांच्या आहाराच्या सवयींना कारणीभूत असल्याचं मत टीनाने मांडलं. “मला मासिक पाळीत पाठदुखी होत नाही. मला क्रॅम्प्सही येत नाहीत. पण, मी बऱ्याचदा मुलींना त्याबद्दल बोलताना ऐकते. तुम्ही तूप खा, तुमचा आहार सुधारा, गरज नसताना डायटिंग करू नका, नीट झोपा. हे केल्याने सगळं ठीक होतं. बहुतेक मुलींना डाएटिंगमुळेही त्रास होतो.”

हेही वाचा – “तुमच्या गलिच्छ राजकारणात…”, अमेय खोपकरांची प्राजक्ता माळीचं नाव घेणाऱ्या सुरेश धस यांच्यावर टीका; म्हणाले, “हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे…”

टीनाची आई सुनीता तिच्याशी सहमत होती. पण तिने डाएटमध्ये कोणत्याही गोष्टीचा समावेश करण्याआधी किंवा डाएटमधून एखादी गोष्ट वगळण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या असं सांगितलं. “गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने डाएटमध्ये एक चमचा तूप समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे हार्ट ब्लॉकेज झालं, असं म्हणून नंतर मला दोष देऊ नका,” असं सुनीता म्हणाली.

टीना आहुजाबद्दल बोलायचं झाल्यास तिने फक्त एका बॉलीवूड चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर ती पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसली नाही. ती आता तिच्या वडिलांचं काम सांभाळते.