Govinda Health Update: १ ऑक्टोबरला सकाळी गोविंदाच्या पायाला गोळी लागल्यामुळे तो जखमी झाला. परवाना असलेल्या बंदुकीतून चुकून त्याला ही गोळी लागली. या घटनेच्या वेळी गोविंदा घरी एकटाच होता. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा कोलकाता येथे होती. जसं तिला गोविंदाला गोळी लागल्याचं समजलं तसं ती मुंबईला रवाना झाली. मुंबईत पोहोचताच आज सकाळी-सकाळी सुनीताने रुग्णालयात जाऊन गोविंदाची भेट घेतली. त्यानंतर गोविंदाच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली.

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाचा व्हिडीओ ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुनीता गोविंदाच्या प्रकृतीची माहिती ( Govinda Health Update ) देत असून चाहत्यांना घाबरू नका असा सल्ला दिला आहे. तसंच लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याचं सुनीताने सांगितलं आहे.

हेही वाचा – भाचा कृष्णा अभिषेकने गोविंदाच्या प्रकृतीबद्दल दिली महत्त्वाची माहिती, म्हणाला, “मामाची प्रकृती…”

सुनीता म्हणाली, “त्यांची तब्येत ठीक आहे. आज आम्ही त्यांना नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करणार आहोत. कालपेक्षा आज प्रकृती चांगली आहे. परवा त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. सर्वांच्या आशीर्वादांमुळे गोविंदा एकदम ठीक झाले आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येक ठिकाणी पूजा-अर्चा केली जात आहे. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. हे सर्व चाहते मंदीर, दर्गा अशा ठिकठिकाणी प्रार्थना करत आहेत. त्यामुळे सर्वांच्या आशीर्वादांमुळे गोविंदाच्या प्रकृतीत ( Govinda Health Update ) सुधारणा झाली आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छिते, अजिबात घाबरू नका. ते एकदम ठीक आहेत. काही महिन्यांतच ते डान्स करायला लागतील.”

हेही वाचा – ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटाच्या कमाईत वाढ, पाच दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

दरम्यान, या घटनेनंतर गोविंदाला ( Govinda Health Update ) तात्काळ मुंबईतला क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर डीसीपी दीक्षिता गेडाम स्पष्ट सांगितलं की, गोविंदाला त्याच्या परवाना असलेल्या बंदुकीमधून गोळी लागली होती. या प्रकरणात काहीही संशयास्पद नाही, त्यामुळे कोणताही गुन्हा किंवा एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. गोविंदाचा मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, कोलकातामधील एका कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडली. सकाळी ६ वाजताचं विमान होतं. त्यामुळे सर्व काही आवरून गोविंदा कपाटात बंदूक ठेवत होता. तेव्हा ती खाली पडली आणि मिसफायर झाली. यामुळे गोविंदाच्या पायाला गोळी लागली.