ऑक्टोबर महिन्यात अभिनेता गोविंदाला त्याची परवानाधारक रिव्हॉल्व्हर हाताळताना झालेल्या अपघातात पायाला गोळी लागली होती. त्यानंतर त्याला तातडीने मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या अपघातानंतर गोविंदावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेला आता एक महिना झाला आहे. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर गोविंदाच्या प्रकृतीची माहिती त्याची पत्नी सुनीता आहुजाने दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका पापाराझीच्या सोशल मीडिया हॅण्डलवर त्याने पोस्ट केलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये सुनीताला गोविंदाच्या प्रकृतीविषयी प्रश्न विचारण्यात आले. “सर, एकदम ठीक आहेत. त्यांना विश्रांती घ्यायला सांगितले आहे”, असे सुनीता हिने सांगितले.

हेही वाचा…कार्तिक आर्यन मिस्ट्री गर्लला करतोय डेट. भर शोमध्ये विद्या बालनने केली पोलखोल; म्हणाली, “फोनवर बोलताना…”

यंदा गोविंदा दिवाळी करू शकला नाही कारण…

याच व्हिडीओत सुनीताने सांगितले की, गोविंदा यंदा दिवाळी साजरी करू शकला नाही. सुनीता म्हणाली, “गोविंदाची प्रकृती आता बरी आहे. तरीही डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिल्याने तो यंदा दिवाळी साजरा करू शकला नाही. त्यामुळे मी मुलांबरोबर दिवाळी साजरी करीत आहे”

दरम्यान, गोविंदा आणि सुनीता यांचा मुलगा यशवर्धन आहुजा यानंही त्याच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. दिवाळी पार्टीदरम्यान त्यानं पापाराझींशी संवाद साधला आणि गोविंदांचे टाके काढण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे सांगितले. तसेच, काही आठवड्यांत गोविंदा पुन्हा डान्स करायला लागतील, असेही त्याने गमतीत सांगितले .

हेही वाचा…Video: अभिनेता राजपाल यादवने दिवाळीच्या दिवशी हात जोडून मागितली माफी, नेमकं काय घडलं?

असा झाला होता गोविंदाचा अपघात

गोविंदाला (Govinda) रुग्णालयात दाखल केल्यावर त्याच्या मॅनेजरकडून त्याच्या अपघातासंदर्भात स्टेटमेंट जारी करण्यात आलं होतं. गोविंदा (Govinda) पहाटे कोलकात्याला जाणार होता. यावेळी परवाना असलेली बंदूक साफ करून कपाटात ठेवत असताना त्याच्या हातातून बंदूक पडली आणि त्याच्या पायाला गोळी लागली, असं गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हाने ‘एएनआय’शी संवाद साधताना सांगितलं. गोळी लागल्यानंतर अभिनेत्याच्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

हेही वाचा…‘बॉबी’ सिनेमासाठी ‘या’ अभिनेत्याने तयार केला होता डिंपल कपाडिया यांचा लूक; खुलासा करत म्हणाल्या, “मला खूप त्रास…”

गोविंदाला ४ ऑक्टोबर २०२४ रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. तेव्हा त्यानं त्याचे चाहते आणि पापाराझी यांचे त्यांनी काळजी व्यक्त केल्याबद्दल आणि प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याबद्दल आभार मानले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govinda misses diwali celebration recovering after accidental gunshot injury psg